दुधाच्या दरात वाढ ?

Shares

सध्या सर्वच गोष्टींच्या दराने तेजी पकडली असून पशुखाद्य आणि चाराच्या किमतींमध्ये तर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. या वाढत्या किमतींमुळे शेतकरी (Farmer) चिंताग्रस्थ झाला आहे. दूध उत्पादक ( Milk Production) शेतकरी तर दुधाच्या किमतीत वाढ करण्याची मागणी करत असल्यामुळे दुधाच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबर ते मार्च महिन्यात पोषक वातावरण असल्यामुळे दुधाच्या उत्पादनात चांगली वाढ होत असते. चाऱ्याच्या वाढत्या किमती पाहता शेतकरी प्रश्नात पडला आहे.

हे ही वाचा (Read This ) निंबोळी अर्क शेतीसाठी किती फायदेशीर ?

दूध उत्पादनाच्या तुलनेत चाऱ्याची किंमत जास्त
मागील वर्षी पशुखाद्यामध्ये ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली असून दूध उत्पादनावरील खर्च वाढत आहे मात्र दुधाच्या किंमतीत वाढ झालेली नाही. आता मात्र दुधाचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही असे दूध उत्पादक सांगत आहेत. त्याचबरोबर इंधन तसेच विजेचे वाढते दर पाहता उत्पादक संघ देखील चिंतेत पडला असून त्यांचा खर्च वाढला आहे. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाच्या जाळ्यात अडकलेला होता त्यात आता तो आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दुधाच्या दरात वाढ व्हावी अशी मागणी दूध उत्पादक करत असल्यामुळे लवकरच दुधाच्या दरात वाढ होईल अशी शक्यता दर्शवली जात आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *