महत्वाचे मसाला पीक दालचिनी, तमालपत्र तयार करण्याची पद्धत , जाणून घ्या

Shares

दालचिनी व तमालपत्र हे मसाल्यातील अत्यंत महत्वाचे मसाले आहेत. दालचिनीच्या झाडापासूनच तमालपत्र मिळते. दालचिनीच्या झाडाची साल वाळवून दालचिनी तयार होते. तमालपत्राच्या तेलाचा उपयोग केला जातो. आपण आज दालचिनी तसेच तमालपत्राची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

दालचिनी तयार करण्याची पद्धत –
१. दालचिनीची लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षी नोव्हेंबर ते मे महिन्यात दालचिनीचे झाड तोडून त्याचे साल काढून दालचिनी तयार होते.
२. चौथ्या वर्षांपासून झाड न तोडता त्याच्या तयार फांद्या तोडून साल काढून घ्यावे.
३. झाडाचे साल सहजपणे निघत असल्यासच झाडाची तोडणी करावी.
४. आवश्यकतेनुसार झाडाच्या फांद्यांचे दोन ते अडीच फुटाचे तुकडे करावेत.
५. फांद्या तोंडल्यांनंतर शक्यतो लगेचच साल काढावीत.
६. साल काढल्यानंतर सावलीत वाळवावी.
७. साल वाळवतांना प्लास्टिक पाईप ला बांधून ठेवावीत जेणेकरून सालीची प्रत खालावणार नाही.
८. साल बिना बांधल्या वाळवल्यास साल गुंडाळले त्यामुळे सालीचा आतील भाग नीट वाळत नाही.
९. साधारणतः ५ ते ६ दिवसात साल वाळते. त्यांनतर हवाबंद डब्यात साठवून ठेवावेत.

तमालपत्र तयार करण्याची पद्धत –
१. दालचिनीचे झाड तोंडल्यानंतर फांद्यांवरची पाने काढून वेगळी करून घ्यावी.
२. ही पाने सावलीत चांगली वाळवावीत.
३. ही पाने वाळण्यानंतर विक्रीस पाठवावीत.
४. एका झाडापासून १. ते २ किलो तमालपत्रे मिळतात.

दालचिनी , तमालपत्र यांची मागणी बाजारात बाराही महिने असते. याची विक्री केल्यास भरपूर नफा होतो.

Shares