कृषी विभाग सतर्क, बनावट खत , बियाणे विक्रेत्यांना पाठवल्या नोटीस!

Shares

रब्बी , खरीप हंगामाच्या सुरुवातीला बनावट बियाणे, खते , कीटकनाशके विक्री करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होते. या बनावटी पदार्थांचा परिणाम पिकांवर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र शेतकऱ्यांनी फसवणूक होऊ नये, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कृषी विभागाने काही महत्वाचे पाऊल उचलले आहेत. कृषी विभाग भरारी पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये तपासणी करत आहे. बनावटी खते, बियाणे, कीटकनाशके बनवणे याचबरोबर त्यांची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत कृषी विभागाने २४ बनावट विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. बनावटी बियाणे, खते, कीटकनाशके यांना आळा बसावा यासाठी कृषी विभागाने ५१८ बियाण्याचे, ३०८ खताचे, १२३ कीटकनाशकाचे नमुने तपासण्याचे उद्धिष्ट केले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी ५२२ बियाणे, २९६ खत , १२८ कीटकनाशकाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. या राबवलेल्या प्रकल्पामध्ये २४ विक्रेते चुकीचे आढळल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये २२ बनावटी बियाणे तर २ बनावटी खत विक्रेत्यांचा समावेश आहे.
न्यायालयात बियाण्यांशी संबंधित १०५ , खतांशी संबंधित ४४, कीटकांशी संबंधित १७ प्रकरणे आहेत. कृषी विभागात बोगस बियाण्याच्या चक्क १८७ तक्रारी आल्या आहेत. त्यांपैकी १०० तक्रारींचा पाठपुरावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला आहे. उर्वरित ८७ चा निर्णय लवकरच होईल असे सांगण्यात आले आहे.
बनावट खत, बियाणे, कीटकनाशके यांची विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *