महाराष्ट्रातील साखर उत्पादक आघाडीवर !

Shares

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यापासून गाळप हंगामास सुरुवात झाली आहे. साखर आयुक्तांनी अनेक साखर कारखान्यांना परवानगी दिली नव्हती. परंतु आता मात्र जवळजवळ सर्व साखर कारखाने सुरु झाले आहेत. साखर उत्पादनाबरोबर साखर निर्यातीवर देखील महाराष्ट्राने बाजी मारली आहे. देशातील साखर निर्यातीपैकी ७० % निर्यात एकट्या महाराष्ट्रातून होत आहे. परदेशात साखरेची वाढती मागणी, साखरेचे वाढते उत्पादन यामुळे साखर उत्पादक अतिशय आनंदात दिसून येत आहे.
जागतिक पातळीवर साखरेची मागणी वाढत आहे. या वेळेस हंगाम हा ऐन मध्यावर आला आहे. कारखानदारांना देशांतर्गत पेक्षा परदेशात निर्यात केल्यावर जास्त उत्पन्न मिळत आहे. साखरेचे दर सध्या स्थिर आहेत. परंतु येत्या काही दिवसात दरात वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे साखर कारखानदार निर्यातीपेक्षा साखरेच्या साठवणुकीवर जास्त भर देत आहे. आतापर्यंत सर्वात जास्त साखर निर्यात महाराष्ट्रातून होत आहे. महाराष्ट्र देशातच नाही तर जागतिक पातळीवर देखील नेहमी आघाडीवर राहिला आहे. देशांतर्गत विक्री पेक्षा परदेशात निर्यात करणे जास्त फायद्याचे ठरत आहे. त्यामुळे परदेशात निर्यातीवर साखर कारखानदार जास्त भर देत आहेत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *