केळीच्या खोडापासून खत व धागा निर्मिती

Shares

केळी फळाचे अनेक फायदे आहेत. केळी पासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. केळी फायदेशीर आहेच त्याच बरोबर केळीचे पाने, खोड देखील अत्यंत फायदेशीर आहे. केळीच्या पानांमध्ये जेवण केले जाते. केळीच्या खोडापासून धागा निर्मिती करता येते इतकेच काय तर त्यापासून खत देखील तयार करता येते. आपण आज केळीच्या खोडाचे फायदे जाणून घेणार आहोत.

केळीच्या खोडापासून धागानिर्मिती –
१. केळीच्या खोडापासून तयार होणाऱ्या धाग्यामध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता असते.
२. या धाग्यापासून दोरी, क्राफ्ट पेपर, दोरखंड, पिशवी, बुटाचे सोल, पुठ्ठा, टिशू पेपर, शोभेच्या वस्तू, नोटांसाठी कागद, फाइलसाठी जाड कागद, पायपोस, फिल्टर पेपर आदीची निर्मिती करता येते.
३. खोडाच्या आतील गाभ्याचा उपयोग भाजी बनवण्यासाठी केला जातो.
४. केळीच्या खोडाचा आतील गाभ्याचा उपयोग कँडी, औषधी , गुरांचा चारा म्हणून केला जातो.
५. खोडाच्या पाण्याचा उपयोग रंगनिर्मिती साठी केला जातो.
६. केळीचा घड काढल्यानंतर खोडापासून दांडा, पाने वेगळे केले जाते. खोड मशीन असलेल्या जागेवर आणले जाते.
७. ही मशीन हाताळायला अतिशय सोपी असते. या मशीनच्या मदतीने दिवसाला ८ ते १० किलो धागा निघतो.
८. कालांतराने १५ ते २० किलो पर्यंत धागा निघतो.
९. धागा काढतांना खोडावरील वाळलेला भाग वेगळा काढावा लागतो. त्यानंतर खोडाची लांबी लक्षात घेऊन त्याचे २ ते ३ भाग करावे लागतात.
१०. खोडाच्या १ मीटर पट्ट्या सुट्ट्या कराव्या लागतात. या पट्ट्या एका लागोपाठ मशिनीमध्ये टाकल्यास धागा निर्मिती होते.

केळीच्या खोडापासून खत निर्मिती –
१. केळीच्या खोडापासून धागा काढल्यानंतर उर्वरित भाग खड्डा करून त्यात टाकावा.
२. त्यामध्ये माती , शेण टाकल्यास उत्तम कंपोस्ट खत तयार होते.
३. काही भागांमध्ये असे सर्व खोड एकत्र आणून त्याचा बेड तयार करवून त्यावर शेण , माती टाकून ठेवतात. ८ ते १० महिन्यांनी त्यापासून खत तयार होते.

अश्याप्रकारे केळीच्या खोडापासून धागा तसेच कंपोस्ट खत तयार करता येते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *