कसे करावे सोयाबीन पिकावरील रोग, किडीचे व्यवस्थापन ?

Shares

सोयाबीन हे तेलबिया व नगदी पिकांमधील एक महत्वाचे पीक मानले जाते. सोयाबीन हे एक उत्तम प्रोटीन स्रोत म्हणून ओळखले जाते. सोयाबीनच्या तेलाचा मोठ्या संख्येने वापर केला जातो. भारतामध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या संख्येने केली जाते. मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा करणाऱ्या जमिनीमध्ये सोयाबीन पीक घेतले जाते. सोयाबीन पिकावरील रोग व किडीवर कसे नियंत्रण करावे याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
सोयाबीन पिकावरील रोग, किडी व त्यावरील उपाययोजना –
खोडमाशी-
१. सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात जास्त प्रमाणात घट होते.
२. खोडमाश्या चमकदार काळ्या रंगाच्या असून त्यांची लांबी ३ मी. मी. पर्यंत असते.
३. ही अळी सर्वप्रथम सोयाबीनची पाने पोखरते त्यानंतर पानांच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात प्रवेश करून झाडाचा आतील भाग पोखरून खातात.
४. कालांतराने हे किडग्रस्त झाड वाळून पिकाचे मोठे नुकसान होते.
५. खोडमाशीमुळे शेंग्यातील दाण्यांचे वजन कमी होऊन उत्पादनात १५ ते ३० टक्यापर्यंत घट होते.
उपाययोजना-
१. पेरणी करतांना प्रति हेक्टर प्रमाणे १०किलो फोरेट जमिनीत मिसळावेत.
२. केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारस प्रमाणे १० लिटर पाण्यात १८. एस . सी. २ मि . ली मिसळून त्याची फवारणी करावी.

चक्रभुंगा-
१. सोयाबीनची लागवड लवकर केल्यास त्यावर चक्रभुंगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
२. ही अळी देठ , फांदी, खोड पोखरून सर्व पोकळ करत जाते.

उपाययोजना-
सोयाबीन पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी चक्रभुंगाचा प्रादुर्भाव आढळून येताच प्रोफेनोफॉस ५० ई. सी. २० मि . ली किंवा इथीलेऑन ५० ई. सी. १५ ते ३० मी. ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हिरवी उंटअळी –
१. ही हिरव्या रंगाची अळी चालतांना उंटासारखा बाक करते. त्यामुळे ही अळी सहज ओळखता येते.
२. ह्या अळ्या पानाचा हिरवा भाग खरडून खातात.
३. यांचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या फक्त शिरा शिल्लक राहतात.
४. या अळ्या फुलांचे, शेंग्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते.
उपाययोजना-
हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मि.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि.ली. प्रमाणे १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावीत.

पाने पोखरणारी अळी –
१. ही अळी ६ ते ८ मी. लांब असून हिचा शरीराचा भाग निमुळता असतो.
२. ही अळी सोयाबीनची पाने पोखरते.
३. या अळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.

उपाययोजना-
या किडीचे नियंत्रण करण्यासाठी मिथिल पॅराथिऑन २ टक्के भुकटीवी २० किलो प्रति हेक्टरी प्रमाणे पुरकणी करावीत.

पोटी माशी –
१. रस शोषण करणाऱ्या अळ्यांपैकी ही एक महत्वाची कीड मानली जाते.
२. या माशीचा रंग हिरवा असून तिच्या पंखांवर पांढरा मेणचट पातळ थर असतो.
३. या माश्या पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे झाडाची पाने गळतात.
४. पोटी माशीचा प्रादुर्भाव झाला असल्यास पिकाची वाढ खुंटते.

उपाययोजना-
पोटी माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावेत.

सोयाबीन पिकावरील रोग व किडींचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना केली पाहिजे. सोयाबीनच्या पिकाचे योग्य नियोजन केल्यास अधिक पिक मिळण्यास मदत होते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *