पपई पिकावरील किडी व रोग व्यवस्थापन

Shares

पपई हे उष्ण कटिबंधातले पीक आहे. पपईमध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. भारतातील अंदाजे ३२५०० हेक्टर जमीन पपई लागवडी खाली आहे. पपई पिकाच्या अनेक जाती आहेत. बदलत्या हवामानाचा परिणाम पपई पिकावर लवकर होतो. पपई फळावर उध्दभवणाऱ्या रोग , किडीमुळे पपईचे मोठ्या संख्येने नुकसान होते.आपण आज पपई पिकावरील कीड व रोग यांचे नियोजन कसे करावेत हे जाणून घेणार आहोत.
पपई पिकावरील कीड व्यवस्थापन –
मावा –
१. मावा कीड पानांमधील संपूर्ण रस शोषून घेते.
२. या किडी मुळे पानांवर चट्टे पडतात.
३. कालांतराने पाने भुरकट , पिवळी पडण्यास सुरुवात होते.
उपाय –
मावा किडीच्या नियंत्रणासाठी १५ मिली डायमेथोएट १० लिटर पाण्यात मिसळून त्यांची फवारणी करावीत.

कोळी –
१. कोळी पानांच्या खालच्या बाजूने रस शोषून घेतात.
२. पानांवर पिवळे ठिपके पडण्यास सुरुवात होते.
३. पाने पिवळी पडून गळायला लागतात.
उपाय-
कोळीच्या नियंत्रणासाठी २५ मिली डायकोफॉल १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावीत.

पांढरी माशी-
१. पांढरी माशी चा प्रादुर्भाव झाल्यास पाने लवकर पिवळी पडण्यास सुरुवात होते.
२. पाने लवकर वाळतात.
उपाय-
पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी १५ मिली डायमेथोएट १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.

पपई पिकावरील रोग व्यवस्थापन-
भुरी रोग –
१. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या वर , खाली पांढऱ्या रंगाची बुरशी येते.
२. पपई फळावर देखील पांढरे डाग पडतात.
३. दमट हवामानात या रोगाचा प्रभाव जास्त होतो.
४. भुरी रोग झाल्यास पाने मोठ्या संख्येने गळण्यास सुरुवात होते.
उपाय-
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा १० ग्रॅम बिस्टीन पावडर १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.

पपई मोझाईक व्हायरस –
१. या व्हायरस मुले पानांच्या शिरा पिवळ्या पडतात.
२. संपूर्ण पानांवर पिवळे ठिपके पडतात.

उपाय –
निरोगी रोपांची लागवड करावीत. या व्हायरस चे लक्षणे दिसताच त्वरित रोगग्रस्त रोपे उपटून त्यांचा नाश करावा.

बुंधा सडणे –
१. पाण्याचा उत्तम निचरा न होणारी जमीन या पिकासाठी निवडल्यास बुंधा कुजतो.
२. झाडाची पाने मोठ्या संख्येने गळतात.
३. झाले उन्मळून पडतात.
उपाय –
पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावीत. बुंध्याजवळ पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

करपा रोग –
१. करपा रोगामुळे पानांचा कडा काळसर पडतो.
२. संपूर्ण पाने वाळण्यास सुरुवात होते.
३. पाने गळून पडतात.
उपाय –
करपा रोगाचे लक्षणे दिसताच ३० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोरीडी किंवा २० ग्रॅम कॅप्टफॉल १० लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या पानांवर त्याची फवारणी करावी.

पपई पिकावरील रोग व किडीचे लक्षणे ओळखुन त्यावर त्वरित उपाययोजना करावीत. जेणेकरून जास्त उतपादन मिळवता येईल

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *