या बाजारसमितीमध्ये मिरचीच्या दराचा ठसका, १६ हजाराचा टप्पा पार
सध्या सगळीकडे उत्पादनापेक्षा शेतमालाच्या दराची जास्त चर्चा होत आहे. शेतमालाच्या दरावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते.ओल्या मिरचीला सात हजार रुपये तर लाल मिरचीला १६ हजाराचा टप्पा पार केला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये मिरचीची तोडणी सुरु असून दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. गोंटुरनंतर दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजारपेठेची ओळख आहे.
हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?
आतापर्यंत बाजार समितीने एक लाख ६५ क्विंटल मिरची खरेदी झाली असून मिरचीच्या दरात तेजी आली आहे.बाजार समितीत लाल मिरचीची आवक कमी असल्याने तेजी कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही वाचा (Read This ) सोयाबीन साठवणुकीपेक्षा विक्रीवर भर? लवकरच उन्हाळी सोयाबीनचे आगमन
लवकरच २ लाखाचा टप्पा पार … ?
बाजार समितीत मिरचीची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली असून ओल्या लाल मिरचीला ७ हजार रुपयांचा भाव तर कोरडी लाल मिरचीने १६ हजारांचा टप्पा पार केला आहे. बाजार समितीत अजून एक महिना हंगाम सुरू राहून यावर्षी बाजार समिती मिरची खरेदीचा दोन लाखांचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे.
ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान