भविष्यात सुपिक शेतिकडे वळावे असे वाटत असेल तर विज्ञानाची व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक – एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी आजची परिस्थिती आहे की आपण सर्व शेतकरी एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे आपल्याला भविष्यात जिवन जगायचं असेल व सुपिक शेतिकडे वळावे असे वाटत असेल तर त्यांना विज्ञानाची व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देने आवश्यक आहे. योग्य व सोयिस्कर आणि सुटसुटित असेल या मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपण शेती मधल्या बारीक सारीक गोष्टी चां विचार करु शकतो.सोयाबिन या पिकाचं संगोपन व पोषण करणे सोपे जाईल.त्या मधे मातीचा विचार होणे गरजेचे आहे.

शेतीतील उत्पादन वाढवायचे आहे, मग हे नक्की कराच…

बागायती शेती मध्ये,मातितील पोषण अत्यंत संवेदनशील असते, पाणी पुरवठा व मातिची सुपिकता यातिल हलकासा बदल सुद्धा झाला तर तात्काळ दिसुन येतो.त्यामुळे कोणत्याही तंत्राचा वापर करताना तो विचारपूर्वक व नियोजन समोर ठेउन विचार करावा लागतो.अनेकदा काय होते की अचानक वातावरणात बदल होतो पिकावर कीडीचा बुरशीचा प्रादुर्भाव होतो.आपन पिकाचं अनियोजित कार्यक्रम चालू करतो तो म्हणजे फवारणीचा अमाप वापर होय. पिकावर येणारा मर रोग हा मानवनिर्मितआहे हे समजणे महत्त्वाचे आहे.आता तो शेतकरी सर्व उपचार करुन हतबल झालेला आहे.शेती साठी लागणारा पैसा यामुळे स्वताचा आत्मविश्वास गमावत आहे.

खरीप हंगामात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर हे सोपे काम मे महिन्यात नक्की करा

मग डगमगत विचार करून येतो “सेंद्रिय शेती” कडे पुन्हा विचार न करता जिवामृत तंत्राचा वापर व जिवामृतचीच फवारणी करत रहातात कोणताही शास्त्रीय आधार न घेता! आता हेच बघा ना सुरवातीला तर छान रिजल्ट मिळतो मग चालले कमी कमी होत. एकदा का माति मधला सुपीकतेचा साठा संपला की उत्पादन घट आलीच होय.नविन पिकासाठी माती कडुन‌ काहीच मदत‌‌ मिळत नाही.कारण ज्या क्षेत्राला शेतकरी तिन ते चार ट्रॅाली शेणखत व इतर खते टाकतो त्या क्षेत्रात २०० लिटर स्लरी तुन ४० किलो शेण व २ किलो गुळ व २ किलो दाळितुन कितिसे पोषण मिळणार हा हि अभ्यास आपन करायला हवा.पण आपन तसं करतंच नाही.

श्रीलंका या देशाच सेंद्रिय शेतीमुळे वाटोळं झालं ? भविष्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती ही खरच काळाची गरज असणार आहे का ?

जर शेती मधे जिवामृत चा अतिरेक झाला असेल तर मातिसोबत झाडातिल कर्ब नत्र (C N ) रेशो बिघडतो व मग तो दुरुस्त व्हायला पाच ते सहा महिने लागतेच हे पहाणे महत्वाचं आहे.आपल्या भाषेत सांगायचे तर , आपल्या पातेल्यात दुध असेल व आपन त्या दुधात विरजन टाकले तर दहि बनेल हे सांगायला नवीन नाही.जर आपल्या पातेल्यात दुधच नसेल तर विरजन टाकुन‌ काय फायदा!तसेच तर जिवामृत हे विरजन आहे.हे पहा आपल्या जमिनित पुरेसे सेंद्रिय किंवा रासायनिक घटक नसताना जिवामृताचा वापर मुलद्रव्यांचे असंतुलन निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो परिणामी शेतीतिल कर्बाचे गणित बिघडते व आपले नुकसान हे अटळ असते त्या बाबतीत दुसरा पर्याय शिल्लक रहात नाहीं.

जैविक शेती करणारे शेतकरी या गोष्टीपासून अज्ञात आहेत की जीवमृतातील जिवाणूद्वारे निर्माण होतअसलेल्या ह्यूमस या घटकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झालीय की ते मातीची तर सोडाच साधी पिकांची तात्पुरती गरज ही भागवु शकत नाही हे समजणे फार महत्त्वाचे आहे.

धन्यवाद

मिलिंद जि गोदे

Mission agriculture soil

information

Save the soil all together

milindgode111@gmail.com

9423361185

राज्यात १ जुलै पासून प्लास्टिक बंदी ; राज्य सरकारचा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *