औषधी गुणांनी परिपूर्ण चुकाची भाजी !

Shares

चुका या पिकवर्गीय वनस्पतीचे मूळस्थान पश्चिम पंजाब असून भारताबरोबर उत्तर आफ्रिका, अफगाणिस्थान, पर्शिया येथे देखील याचे पीक घेतले जाते. चुका ही वनस्पती ओसाड जमिनीवर वाढलेली दिसते तसेच या वनस्पतीची शेती देखील केली जाते. या पिकाच्या खोडाच्या तळापासूनच फांद्या तयार होतात. चुक्याची पाने अंडाकृती, लंबवर्तुळाकार, विशालकोनी आकाराची असतात. ही वनस्पती चवीस आंबट असते. चुका ही एक औषधी वनस्पती आहे. चुकाच्या बिया, पाने यांचा उपयोग औषधी तयार कारण्यासाठी होतो. आपण आज चुकाच्या औषधी उपयोगाची माहिती जाणून घेणार आहोत.
चुका वनस्पतीचे औषधी उपयोग-
१. ह्रदयाचे आजार, उचकी, दमा, अपचन, मूळव्याध, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर चुका उपयुक्त ठरतो.
२. या वनस्पतीस लोह विरघवळणारी तसेच मांसपाचक म्हणून शीघ्र काम करणारी वनस्पती म्हणून ओळखले जाते.
३. चुक्याच्या बिया पौष्टिक , शीत असतात.
४. शरीरावर सूज आली असेल तर चुक्याची पाने वाटून त्याचा लेप तयार करून सूज आलेल्या जागेवर लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
५. विंचू, गांधीलमाशी अश्या विषारी प्राण्यांच्या दंशावर चुक्याचा वापर करतात.
६. डोके दुखत असेल तर त्यावर चुका व कांद्याचा रस चोळावा.
७. भूकवर्धक गुणधर्म चुक्यामध्ये दडलेले आहेत.
८. चुका वातदोष कमी करण्यास मदत करते.
९. चुक्याच्या भाजीमुळे पचनक्रिया सुधारते.

अश्या बहुगुणी चुक्याचे सेवन करणे शरीरास फायदेशीर ठरते. यापिकास बाजारात तसेच औषधी तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने मागणी असते त्यामुळे या पिकाची लागवड करणे फायदेशीर ठरते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *