गवती चहाची लागवड व उत्पादन

Shares

गवती चहा मुख्यतः युरोप , ऑस्ट्रेलिया , आफ्रिका खंडातील उष्णकटिबंधीय तृणवर्णीय वनस्पती आहे. भारतात केरळ , महाराष्ट्र , कर्नाटक मध्ये गवती चहाचे पीक घेतले जाते. गवती चहा बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे.


जमीन व हवामान –
१. हलक्या ते भारी जमिनीत हे पीक घेतले जाते.
२. निचरा होणारी काळी , रेताड जमीन या पिकासाठी योग्य ठरते.
३. पाणी साचून जमिनीचा निचरा होत नसेल अश्या जमिनीत हे पीक घेऊ नये.
४. गवती चहाच्या पिकास उबदार व उष्ण हवामान मानवते.
५. समप्रमाणात पडणारा पाऊस व भरपूर सूर्यप्रकाश या पिकास पोषक असा ठरतो.

सुधारित जाती –
१. सीकेपी -२५
२. ओडी – १९
३. ओडी- २३
४. ओडी- ४४०
५. ओडी- २५
६. आरआरएल – १६
७. प्रगती
८. कावेरी
९. कृष्णा
१०. निमाया

लागवड –
१. एकदा लागवड केल्यांनतर गवती चहाचे पीक ४ ते ५ वर्षापर्यंत जमिनीत राहते.
२. गवतीचहाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी.
३. जमिन आडवी व उभी नांगरून २ ते ३ कुवळ्याच्या पाळ्या देऊन जमीन भुसभूशीत करून घ्यावी.
४. शेवटची कुळवणी करतांना एकरी ४ ते ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावेत.
५. पाण्याची उपलब्धता असल्यास गवती चहाची लागवड वर्षभर करता येते.
६. गवतीचहाची लागवड बिया किंवा गवती चहाच्या आलेल्या नवीन फुटव्यापासून करता येते.
७. एका वर्षानंतर गवती चहास अनेक फुटवे येतात.
८. गवती चहाच्या फुटव्यांची ६० x ६० सेंमी ते ७५ x ७५ सेंमी अंतरावर लागवड करावी.

पाणी व्यवस्थापन –
१. उन्हाळ्यात पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
२. पावसाळ्यात जास्त आवश्यकता भासल्यास पाणी द्यावे.
३. जमिनीत पाणी टिकून राहिल्यास पिकांवर अनिष्ट असा परिणाम होतो. त्यामुळे जास्त पाणी राहू नये याची काळजी घ्यावी.

कापणी –
१. पहिली कापणी लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांनी करावी.
२. नंतर सर्व कापण्या २ ते ३ महिन्यांनी फुलोऱ्याआधी कराव्यात.
३. गवती चहाच्या पिकाची कापणी धारदार विळाच्या साहाय्याने जमिनीपासून १५ ते २० सें मी अंतरावर करावी.

उत्पादन –
१. पहिल्या कापणीत प्रति एकर उत्पादन कमी मिळते.
२. दुसऱ्या कापणीपासून उत्पादनात वाढ होते.
३. पहिल्या वर्षी प्रति एकर ७ ते ८ टन उत्पादन मिळते.
४ . दुसऱ्या वर्षी १० ते १२ टन उत्पादन मिळते.
५. तिसऱ्या व चौथ्या वर्षी १५ ते १८ टन पर्यंत उत्पादन मिळते.
६. नंतरच्या काळात उत्पादन कमी कमी होत जाते त्यामुळे फेरपालट करून पुन्हा लागवड करावी.

दिवसेंदिवस गवती चहाच्या तेलाची मागणी बाजारात वाढत चालली आहे. गवती चहाचे पीक आलटून पालटून घेतल्यास नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *