खपली गव्हाचे फायदे

Shares

महाराष्ट्रात कित्येक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. त्यात हातसडीचा गहू म्हणजेच खपली गहूचा रोजच्या आहारात समावेश करतात. परंतु सध्याच्या काळ बघता बाजारात या गव्हाची विक्री कमी प्रमाणात होत आहे. खपली गव्हाच्या पोळ्या , पुरण पोळ्या असे सर्वच पदार्थ अत्यंत चविष्ट लागतात. खपली गव्हामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते.खपली गहू हा सेंद्रिय पद्धतीनेच घेतला जातो त्यामुळे त्यात कोणतेही हानिकारक केमिकल्स नसते.या गव्हाचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. जाणून घेऊयात खपली गव्हाचे फायदे.

खपली गव्हाचे फायदे –
१. खपली गहू रक्तातील शर्करा म्हणजेच ग्लुकोस कमी करण्यास मदत करते.
२. हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यास उपयुक्त ठरते.
३. यात फायबर्सचे प्रमाण अधिक असते.
४. याच्या रोजच्या सेवनाने रोग प्रतिकार क्षमता वाढते.
५. यात लोह , मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्वे उपलब्ध असतात त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.
६. हा गहू आतड्यांच्या कर्करोगावर उपयुक्त ठरतो.
७. हाडांची झीज भरून काढण्यास मदत करतो.
८. दातांच्या तक्रारींवर हा गहू निर्बंध लावतो.
९. शरीराची शक्ती वाढविणारा पदार्थ म्हणून याला ओळखले जाते.
१०. हा गहू पचायला हलका असतो.
११.खपली गव्हाचा आहार गर्भवती महिलांसाठी अत्यंत पोषक असा ठरतो.
२. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

खपली गव्हाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तरीही जर तुम्हाला बाजारात खपली गहू उपलब्ध झाले तर त्याचे सेवन रोजच्या आहारात करायला विसरू नका.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *