राज्यात सौरऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा होणार फायदा

Shares

शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना, प्रकल्प राबवत असते. असाच एक प्रकल्प शेतकऱ्यांना दिवस सिंचनासाठी वीजपुरवठा व्हावा यासाठी राबविला जात आहे. राज्य शासनाच्या सौर कृषिवहिनी योजनेंतर्गत आता पर्यंत १,४४० मेगावॅट क्षमतेचे करार करण्यात आलेले असून राज्यात १०८ सौर कृषिवाहिन्यांद्वारे ४५ हजार ६६४ शेतकऱयांना वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र
या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीमागील मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा कृषिपंपांना वीजपुरवठा व्हावा असा आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सौर ऊर्जा प्रकल्पावर जास्त भर दिला आहे. या योजनेअंतर्गत कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या ५ किलोमीटर पर्यंतच्या परिघातामध्ये २ ते १० मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प कार्यान्वित करणे तसेच कृषिवाहीने द्वारे दिवस कृषी पंपांना वीजपुरवठा पुरवणे. नुकतेच काढलेल्या निवेदितांना ३८५ मेगावॅट क्षमतेचा चांगला प्रतिसाद मिळाला असून ३९६ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित महावितरणकडून राज्यभरात राबविण्यात येत आहे. सौरऊर्जा प्रकल्पमधील १४४० मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे करार करण्यात आले आहे. यांपैकी ३९६ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. त्यामध्ये आता १११ मेगावॅटची अधिक भर पडणार आहे.
महावितरणच्या २७२५ उपकेंद्राच्या ५ किलोमीटर परिघामध्ये कमीत कमी ३ तर अधिकाधिक ५० एकर क्षेत्रफळ शासकीय तसेच खासगी नापीक व पडीक जमीन भाडेपट्टीवर घेण्यात येत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *