कापसाला हमीभावा पेक्षा दीडपट जास्त दर,आवक मात्र कमी

Shares

यंदा कापसाच्या दराने इतिहास (History) बनवला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. कारण कापसाच्या दराने (Cotton Price) १० हजाराचा टप्पा पार केला आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीदरापेक्षा दीडपट अधिक दर कापसाला मिळत असून शेतकऱ्यांना अधिक दर वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली असून त्याची साठवणूक करण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कापसाची साठवणूक करून ठेवली आहे

दर वाढूनही अपेक्षेप्रमाणे विक्री नाही
खरीप हंगामात बदलत्या वातावरणामुळे तसेच अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन कमी झाले असून शासनाने लांब धाग्याच्या कापसाला ६०२५ रुएए प्रति क्विंटल तर माध्यम कापसाला ५७२५ रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव घोषित केला होता. कापसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याच्या मागणीत वाढ झाली होती. मात्र दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना कापसाची विक्री करणे परवडत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस (Cotton) साठवणुकीवर जास्त भर दिला होता. आता मात्र चित्र बदलले आहे कापसास १० हजार प्रति क्विंटल प्रमाणे दर मिळत आहे. मात्र अजूनही कापसाची अपेक्षेप्रमाणे विक्री होत नाहीये.

कापसाचे दर वाढण्यामागील कारण काय ?
कापसाची मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून कापसाचे दर (Cotton Price) वाढत आहेत. त्यातच सरकीचे दर २८०० रुपयांवरून ४००० रुपये प्रति क्विटलवर पोहोचल्याने खुल्या बाजारपेठेत कापसाच्या दराला झळाळी मिळत असली तरी आवक मात्र कमी होत आहे. कापसाला १० हजार प्रति क्विंटल प्रमाणे दर मिळत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *