शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये
शेतकरी अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाच्या शोधात नेहमी असतात. अश्याच एका पिकाची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही या हे मुख्य पीक म्हणून तर घेऊच शकतात त्याचबरोबर तुमच्या शेताच्या बांधावर देखील या पिकाची लागवड करू शकता. हे पीक म्हणजे निलगिरीचे पीक होय. निलगिरी हे मायर्टेसी प्रजातीचे एक अतिशय उंच झाड असून याच्या ६०० प्रजाती आढळतात. यांपैकी बहुतेक प्रजाती या ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया मध्ये आढळतात. या प्रजातींपैकी सर्वात उंच प्रजाती युकॅलिप्टस क्रिपनेस ही असून याची झाडे २३३ फूट उंच जातात.
भारतामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक आदी राज्यात निलगिरीची लागवड केली जाते. निलगिरीची योग्य पद्धतीने लागवड केल्यास त्यापासून ५ वर्षातच जवळजवळ ५० लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.
हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?
निलगिरीचे फायदे
१. निलगिरीच्या झाडापासून उत्तम दर्जाचा लाकूड मिळतो. या लाकडाचा उपयोग जहाजे, लाकडाचे खांब बनवण्यासाठी केला जातो.
२. निलगिरीच्या पानांमध्ये तेल असते. हे तेल घसा, नाक, सर्दी, पोट यासाठी औषध म्हणून वापरले जाते.
३. निलगिरीच्या झाडापासून डिंक देखील मिळतो.
४. निलगिरीच्या झाडांची साल कागद तसेच चामडे बनवण्यासाठी वापरतात.
ही वाचा (Read This ) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा
जमीन व हवामान
१. सामान्य मातीमध्ये निलगिरीच्या झाडांची वाढ होते.
२. निलगिरीसाठी ३० ते ३५ अंश तापमान उत्तम ठरते.
३. उत्तम पाण्याचा निचऱ्या होणाऱ्या जमीनीत हे पीक जास्त चांगले येते. जमिनीत पाणी साचून राहिल्यास या पिकाची वाढ चांगली होत नाही.
४. निलगिरीसाठी चिकणमाती असलेली जमीन अधिक जास्त उत्तम ठरते.
५. क्षारयुक्त तसेच खारट जमीन यासाठी योग्य ठरत नाही.
ही वाचा (Read This ) या फळबागाचे योग्य नियोजन करून मिळवा वर्षभर उत्पन्न
निलगिरीच्या जाती
निलगिरीच्या प्रामुख्याने ६ जाती भातामध्ये आढळून येतात. त्यांची कमाल उंची ही ८० मीटर पर्यंत असते.
१. युकॅलिप्टस ऑब्लिव्हका
२. युकॅलिप्टस डेलेगेटेन्सिस
३. युकॅलिप्टस डायव्हर्सिकलर
४. युकॅलिप्टस नायटेन्स
५. युकॅलिप्टस ग्लोब्युल्स
६. युकॅलिप्टस विमिनालिस
ही वाचा (Read This ) PM-SYM : शेतकऱ्यांसाठीची काय आहे पेन्शन योजना, कसा करावा अर्ज?
लागवड पद्धत
१. निलगिरी लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावीत.
२. निलगिरीच्या झाडाची लागवड बियाणे आणि कटिंग्ज अश्या दोन्हीपासून करता येते.
३. निलगिरीची झाडे उंच असल्यामुळे जमिनीत यांची लागवड केली जाते.
४. निलगिरीच्या रोपांच्या योग्य वाढीसाठी त्यांना मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश, हवा, पाणी असणे गरजेचे आहे.
५. निलगिरीच्या लागवडीसाठी शेत तयार करतांना नांगरणी यंत्राच्या साहाय्याने शेताची खोल नांगरणी करावी लागते.
६. शेत समतोल झाल्यानंतर ओळीत ५ फूट अंतरावर १ फिट रुंदीचे खोल खड्डे तयार करावेत.
७. प्रत्येकी रांगेत ५ ते ६ फूट अंतर ठेवणे गरजेचे आहे.
८. लागवडीपूर्वी साधारणतः २० दिवस अगोदर हे खड्डे तयार करावेत.
हे ही वाचा (Read This ) रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती
रोग व कीटकांपासून संरक्षण
१. दिमक कीटक निलगिरीच्या नवीन रोपांसाठी अतिशय घातक असून यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते .
२. दिमकापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी निंबीसाईट २मि .ली प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावीत .
३. निलगिरी पिकांवर झाडांच्या खोडात गाठ होणारा रोग आढळतो. हा रोग झाल्यास झाडाची पाने सुकतात,वाढ खुंटते ,पानांची वाढ होत नाही.
४. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच झाड काढून टाकावेत.
हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय
उत्पादन व उत्पन्न
१. निलगिरीच्या लागवडीसाठी जास्त खर्च येत नसून एका हेक्टर मध्ये ३ हजार रोपांची लागवड करता येऊ शकते.
२. निलगिरीचे रोपे रोपवाटिकेत ७ ते ८ रुपये प्रमाणे मिळत असून खरेदीवर सुमारे २१ हजार रुपये खर्च येतो. यामध्ये इतर खर्च मिळवला तर एकूण २५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
३. साधारणतः ४ ते ५ वर्षांनंतर प्रत्येक झाडापासून सुमारे ४०० किलो लाकूड मिळते. म्हणजे ३००० झाडांपासून सुमारे १२,००,००० किलो लाकूड मिळते.
४. बाजारामध्ये निलगिरीचे लाकूड ६ रुपये प्रति किलो प्रमाणे विकले जात असून सुमारे ७२ लाख रुपये तुम्ही मिळवू शकता.
५. लागवडीसाठी लागणारा खर्च वजा केल्यास तुम्हाला ५०लाख रुपयांचा लाभ होतो.
ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान
टीप
निलगिरीचे रोप लावल्यानंतर त्याची काळजी घेणे देखील आवश्यक असून इतर झाडांप्रमाणेच निलगिरीच्या पिकांवर कीटक आणि रोगांचा धोका उध्दभवत असतो. त्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही. तर उत्पादन चांगले येतील.