कांदा अजून किती रडवणार, उन्हाळी कांद्याचे उत्पादनही घटले अन् दरही

Shares

कांद्याच्या कमी होत असलेया दरामुळे शेतकरी निराश होताना दिसत आहे. ऐन उन्हाळ्यात कांदा बराजारात उतरत असताना दरात घसरण पाहायला मिळाली होती. ३ हजार ते ३ हजार ५०० असा दर फेब्रुवारी महिन्यात कांद्यांना मिळत होता, मात्र हळूहळू दर घसरून थेट ८०० ते ९०० प्रति क्विन्टल एवढा पडला, त्यामुळे शेतकरी कांदा विकण्याची घाई न करता साठवणुकीवर भर देत आहे. नाशिक जिल्यात कांदाचाळ मोठ्या प्रमाणात आहे मात्र इतर भागातील शेतकर्यांना कांदा विक्री शिवाय पर्याय नाही.

हे ही वाचा (Read This दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी  2 लाखापर्यंत मर्यादा असलेले KCC कार्ड, तुम्हीही याप्रमाणे लाभ घेऊ शकता

दरम्यान, कांदा टिकवण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने कांदा साठवण करणे आवशयक आहे, कांदा चागल्या प्रकारे साठवण न केल्याने ७० ते ८० टक्के नुकसान होऊ शकते. मात्र चागल्या प्रकारे हा कांदा साठवला तर फक्त १० ते १२ टक्केच नुकासान यात होते, सडलेले कांदे वेगळे करणे, अनुकूल वातावरणात कांदा ठेवणे हे कांदा टिकवण्यासाठी फायद्याचे ठरते.    

हे ही वाचा (Read This कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न काही कमी होताना दिसत नाही. उसानंतर कांदा हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नगदी पीक आहे. नैसर्गिक आपत्तीच्या प्रभावातून शेतकरी वाचला नसला तरी भाव कोसळल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदा शेतकऱ्यांना ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकावा लागत आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध कांदा उत्पादक प्रदेश असलेल्या नाशिकच्या येवला तालुक्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने कांद्याला कमी भाव मिळाल्याने नाराज होऊन शेतात ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट केले.

हे ही वाचा (Read This या आंतरपीकामुळे मिळेल भरघोस उत्पन्न

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *