कोरोनामुळे स्मार्टफोनचे दुष्परिणाम

Shares

कोरोनाचा विळखा वाढला आणि लॉकडाऊनमुळे सर्वांच्या हातात असणाऱ्या स्मार्टफोनचा वापर वाढला. ज्यात लहान मुलांसोबतच मोठ्यांचाही तेवढाच समावेश आहे. पण नकळतपणे या स्मार्टफोनचा वाढणारा वापर आपल्यासाठी किती घातक आहे याची आपल्याला अजून जाणीव सुद्धा नाही. चला तर पाहुयात स्मार्टफोन वापराच्या काय आहेत गंभीर समस्या…

डोळ्याचे विकार

स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवल्यामुळे डोळ्याचे विकार दिसून येताय. कमी वयात चष्मा लागणे, नजर कमजोर होणे, अंधुक दिसणे, डोळ्यासमोर अंधारी येणे या व्यतिरिक्त एका शोधाप्रमाणे स्मार्टफोनमुळे वयाच्या पन्नासव्या वर्षापर्यंत डोळे गमावावे लागण्याची स्थिती निर्माण होत आहे.
कारण ब्ल्यू लाइट डोळ्याच्या रेटिनामध्ये महत्त्वपूर्ण अणू सेल किर्ल्समध्ये परिवर्तित करतं. यामुळे डोळ्यावर विपरित परिणाम दिसून येतं. शोधाप्रमाणे सतत ब्ल्यू लाइटमध्ये काम केल्याने डोळ्यासंबंधी आजार होऊ शकतात. किंवा 50 या वयात बघण्याची क्षमता गमावावी लागू शकते.

1. बोटांमध्ये वेदना – सतत मोबाइल वापरल्याने बोटांना वेदना जाणवू शकतात. याने बोट दुखणे, बोटात ताणल पेटके येणे अशी समस्या उद्भवू शकते.

2. मानेत वेदना – फोन वापरताना आपल्या मानेत वेदना होणे अगदी साहजिक आहे. खूप वेळ मानेवर जोर देणे किंवा एकाच अवस्थेत राहणे हानिकारक ठरु शकतं.

3. पाठ दुखी – सतत बसून स्मार्टफोन वापरल्याने पाठ दुखणे सुरु होऊ शकतं. यापासून वाचण्यासाठी सक्रिय राहणे गरजेचे आहे.

4. खांदे दुखणे – हातात फोन धरुन आपण खूप-खूप वेळ फोन वापरत असता, अशात खांद्यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो आणि यामुळे वदेना सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बचावाचे उपाय

अशात बचावासाठी आपण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या सेटिंगमध्ये जाऊन ब्ल्यू लाइट ऑन करू शकता. डिस्प्लेवर हाय-क्वालिटी स्क्रीन प्रोटेक्टर्स वापरू शकता. सतत लॅपटॉप/कॉम्प्यूटरवर काम करत असाल तर वेळोवेळी आय चेकअप करत राहावे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आय ड्रॉप्स वापरावे. काम करताना ब्रेक घेऊन डोळे गार पाण्याने धुवावे. ब्ल्यू लाइट आणि यूव्ही फिल्टर चष्मा वापरावा.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *