सल्ला नको शेती उत्पादनाला भाव द्या..! एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी आपल्या शेती क्षेत्रात काही प्रश्न अतिशय गंभीर आहे.जसे माती बाबत त्याच बरोबर शेतीसाठी योग्य मार्गदर्शन नाही असे किती तरी व भरपूर प्रश्न आहे.काही तज्ञ तर म्हणतात परवडत नसेल तर शेती करू नका! सल्ला देणाऱ्यांची संख्या मोठी आहे .काही तर असे मार्गदर्शक सोशल मीडियावर पाहीले मि ज्यांच्याकडे गुंठाभर जमीन नाही ज्यांच्या पिढय़ांत शेती कधी पाहिली नाही व कसली नाही अशी मंडळीही शेती कशी करावी याचे सल्ले देऊ लागली.पण अडचणीत सापडलेल्या शेतकरी यांना सल्ले देणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. सल्ला देणाऱ्यांचा शेती विषयातील अभ्यास आहे की नाही याला फारसे महत्त्व नसते. पण त्यांना वाटत अडचणीत सापडलेल्यांना सल्ला देणे आपला जन्मसिद्ध अधिकार आहे या पद्धतीने लोक सल्ले देतात.

शेतीतील उत्पादन वाढवायचे आहे, मग हे नक्की कराच…

गेल्या काही वर्षांत राज्यातील शेतकरी शेतमालाच्या बाजारामुळे अतिशय अडचणीत सापडलेला असून शेतकऱ्यांनी कोणते उत्पादन घेतले पाहिजे? पीक पद्धतीत कोणता बदल केला पाहिजे? आमच्या विदर्भात सिंचन प्रश्न हा अतिशय गंभीर आहे. बागायती शेती करणे व त्या मधे काय चुकीचे आहे हे सांगण्याची चढाओढ सुरू झाली. शेतकऱ्याला काहीच कसे कळत नाही व आपण कसे अभ्यासू आहोत हे सांगणाऱ्यांची संख्या वाढली. येथे गरीबांना कोणीच विचारत नाही त्याची अनुभूती गेल्या काही वर्षांपासून शेतकरी घेत आहे.

आज शेतकरी कापुस पेरणी करावी की सोयाबीन पेरावे असा विचारतोआहे. शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. माती परीक्षण केले पाहिजे, खताचा कमी वापर केला पाहिजे असे सल्ले देणारे विद्वान मोठय़ा प्रमाणावर आहेत मात्र उत्पादित केलेल्या मालाची किंमत काय मिळाली पाहिजे याबद्दल मात्र कोणी बोलत नाही. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने धाण्य उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजाराचा फटका इतका जोराचा बसतो आहे की, त्याचा उत्पादनाचा खर्चही निघेनासा झाला आहे. कडधान्याकडे शेतकऱ्याने वळावे, तेलबियाचे उत्पादन घ्यावे असा सल्ला देतात.

श्रीलंका या देशाच सेंद्रिय शेतीमुळे वाटोळं झालं ? भविष्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती ही खरच काळाची गरज असणार आहे का ?

शेतकऱ्यानी मोठय़ा प्रमाणावर तेलबिया व कडधान्याचा पेरा केला. या वर्षी चांगला पाऊस झाला त्यातून उत्पादनही दरवर्षीपेक्षा मोठय़ा प्रमाणावर झाले, मात्र बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी भावाने माल विकावा लागत असल्यामुळे चांगले उत्पादन होऊनही शेतकरी संकटात सापडला आहे. पीक पद्धतीत बदल करायचा म्हणजे नेमके काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. ८० टक्के शेतकरी कोरडवाहू शेती करतो. ही शेती करताना पावसाच्या पाण्यावरच त्याला अवलंबून राहावे लागते त्यामुळे वर्षांतून काही ठिकाणी एक पीक तर काही ठिकाणी मुश्कीलीने दोन पिके घेता येतात. अवेळी पावसामुळे उत्पादनाचा भरवसा नाही व उत्पादन झाले तर भाव मिळेल याची खात्री नाही.

इकडे आड अन् तिकडे विहीर अशी अवस्था शेतकऱ्याची सातत्याने होतआहे.वादळ,गारपीट,पिकावर रोगच्या संकटातून पिकांचा बचाव करता येऊ शकतो परंतु शेतकरी संकटात आहे…

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल धन्यवाद…

शेतीच्या मधे विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल….

धन्यवाद मित्रांनो

मिलिंद जि गोदे

Save the soil all together

milindgode111@gmail.com

Mission agriculture soil information

राज्यात १ जुलै पासून प्लास्टिक बंदी ; राज्य सरकारचा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *