ई-पीक नोंदणीसाठी अखेरची मुदत वाढ, १५ मार्च अंतिम तारीख

Shares

ई- पीक नोंदणीसाठी आता शासनाने तिसऱ्यावेळी मुदतवाढ दिली असून शेतकरी आता १५ मार्च पर्यंत शेतकरी मोबाइल अँप द्वारे पीक नोंदणी करू शकतात.

शेतकऱ्यांना आता आपल्या सातबारा (७/१२) वर विविध पिकांची नोंदणी करण्यासाठी तलाठी कडे जाण्याची गरज नसून ई-पीक पाहणी मोबाइल अँप च्या साहायाने नोंदणी करू शकतात.

ई-पीक नोंदणी प्रकल्प महसूल विभागाकडून १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभरात राबवण्यात आलं आहे. रब्बी हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदणीसाठी ई-पीक पाहणी अँप चे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे. तर तुम्हाला नवीन व्हर्जन उपडेट करून घेणे गरजेचे आहे.

ही वाचा (Read This) या कीटकनाशकांवर बंदी, पिकांसह मानवी आरोग्यावर होत होता वाईट परिणाम

ई-पीक पाहणीसाठी नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ

रब्बी हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे पीक नोंदणी करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु अनेक भागांत कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांना पीक नोंदणी पूर्ण करता आली नव्हती.

त्यामळे आता आता मुदतीमध्ये अधिक वाढ करून १५ मार्च पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.

हे ही वाचा (Read This) नाबार्ड डेअरी योजना, ५० टक्के अनुदान

पूर्व तयारी करणे गरजेचे …

सध्याची स्थिती बघता निसर्गाचा काही नेम नाही. याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. तर पुन्हा अवकाळीचे संकट डोक्यावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची, पशुधनाची तसचे शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांची पूर्वकाळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून अवकाळीचे संकट उध्दभवल्यास जास्त नुकसान होणार नाही.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *