या कीटकनाशकांवर बंदी, पिकांसह मानवी आरोग्यावर होत होता वाईट परिणाम

Shares

शेती बरोबरच मानवी आरोग्याच्या हितासाठी सरकार योग्य असा निर्णय घेत असते. तर असाच एक शेती संबंधित निर्णय घेतला आहे. तो म्हणजे असे काही कीटकनाशके आहेत जे मानवी आरोग्यास हानिकारक ठरतात अश्या कीटकनाशकांवर सरकारने बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता पर्यंत २६ कीटकनाशकांवर सरकारने बंदी केली होती. त्यामध्ये अधिक २ कीटकनाशकांची भर पडली आहे. टेरासायक्लिन आणि स्ट्रेप्टोमायसिन मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्यामुळे यांची विक्री करता येणार नाही.

नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने सरकार अनेक पावले उचलत असून अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम राबवत आहेत. काही कीटकनाशके पिकांना संसर्गापासून वाचवत असले तरी त्यांच्या फवारणी नंतर मानवी जीवनावर वाईट परिणाम होत आहे.

हानिकारक कीटकनाशकांवर बंदी ..

यापूर्वी देखील केंद्र सरकारने जवळजवळ २७ धोकादायक कीटकनाशकांवर बंदी घातली होती. परंतु अनेक शेतकऱ्यांकडून या निर्णयावर अंबलबजावणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सर्व कीटकनाशकांचा आढावा घेण्यात येत असून या आढाव्यानंतर मानवी आरोग्यास धोकादायक वाटणाऱ्या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात येत आहे. आता या दोन कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली आहे.

कीटकनाशकांचा वापर केवळ बटाटा, तांदूळ आदी साठी केला जातो असे सांगण्यात आले होते. मात्र टोमॅटो, सफरचंद सारख्या फळांची पडताळणी केल्यास त्यांच्यावर देखील कीटकनाशकांचा वापर केल्याचे निदर्शनात आले होते. त्यानंतर या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली.

कीटकनाशकांचा प्रमाणाबाहेर वापर धोकादायक …

कीटकनाशकांचा वापर प्रमाणाबाहेर केल्यास त्याचा वाईट परिणाम पिकांवर होतो. कीटकनाशकांमधील रसायनांचे प्रमाण कमी जास्त झाल्यास त्याचा वाईट परिणाम पिकांबरोबर मानवी शरीरावर देखील होतो. त्यामुळे पंजाबमध्ये बासमती तांदूळ पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांवर बंदी आणण्यात आली आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *