या ९० दिवसीय पिकाची लागवड करून मिळवा भरगोस उत्पन्न, आंतरपिकासाठी उत्तम पर्याय

Shares

शेतकरी आता पारंपारिक शेती व्यतिरिक्त विविध उत्पादने घेत शेती करीत आहे. फळे, भाजीपाला, धान्य वगळता आता शेतकरी औषधी पिकेही घेत असून त्याचा चांगला फायदा होत आहे.

जर तुम्हाला औषधी पिके घ्यायची असतील तर तुम्हाला कमाईचे बरेच पर्यायही मिळतील.
आपल्या देशात औषधी वनस्पतींची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तर आपण अश्याच एका औषधी वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत.

भृंगराज ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात विविध रोगांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो.केस गळणे, केस पिकणे, केसांची वाढ, यकृत, मूत्रपिंड आणि पोटाचे अनेक आजार टाळण्यासाठी आयुर्वेद चिकित्सक अनेकदा भृंगराजचे सेवन करण्यास सांगतात.

तर माका म्हणजेच भृंगराज चे अनेक फायदे असल्यामुळे त्यास मागणी देखील जास्त आहे.

हे ही वाचा (Read This )  आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

जमीन व हवामान

  • भृंगराजचे पीक सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते.
  • पाणथळ जागेच्या ठिकाणी हे पीक जास्त वाढीस मानवते.
  • भृंगराजच्या वाढीसाठी २०० ते ३५० सें . तापमान योग्य ठरते.
  • ८० टक्क्या पर्यंत आद्रता असल्यास या पिकाची उत्तम वाढ होते.

लागवड

  • भृंगराज हे आंतरपीक म्हणून मुख्य पिकांमध्ये घेता येते.
  • आंतरपीक घेतांना मुख्य पिकांमध्ये ३० x ३० x ३० सेमी अंतरावर रोपांची लागवड करावी.
  • रोपे तयार करून लावावेत.
  • रोपांची लागवड करतांना पिकास खते देण्याची आवश्यकता नाही.
  • पिकांना पाणी देतांना संपूर्ण जमीन ओली होईल याची काळजी घ्यावी.
  • जमीन सतत ओली ठेवावी.

हे ही वाचा (Read This ) शेतीतील एक वेगळा प्रयोग, या पिकाची लागवड करून घ्या चांगले उत्पन्न

कापणी आणि उत्पादन

  • भृंगराजची पहिली कंपनी ही १०० ते १२० दिवसांनी करता येते.
  • कापणी करतांना ५० % फांद्या कापाव्यात.
  • पहिल्या कापणी नंतर दुसरी कापणी ही ७५ ते ९० दिवसांनी करावी.
  • कापलेल्या फांद्या सावलीत ठेवाव्यात.
  • पहिल्या वर्षी साधरणतः अडीच ते तीन टन ओल्या फांद्या मिळतात.
  • दुसऱ्या वर्षी साडेतीन ते चार टन ओल्या फांद्या मिळतात.

अधिक उत्पन्न कमावण्याची उत्तम संधी

या औषधांची मागणी वाढत आहे आणि खास गोष्ट अशी आहे की त्यामध्ये कमी गुंतवणूक करुन चांगली शेती होऊ शकते. याव्यतिरिक्त ही पिके चांगल्या किंमतीला बाजारात विकली जातात. म्हणून जर आपण ती योग्य तंत्रज्ञानाने विकसित केली तर आपण सहजपणे चांगले पैसे कमवू शकता

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *