शेतीतील एक वेगळा प्रयोग, या पिकाची लागवड करून घ्या चांगले उत्पन्न

Shares

शेतकरी आता शेती व्यवसायामध्ये विविध प्रयोग करत आहेत. आपण आज अश्याच किफायतशीर ठरणाऱ्या पिकाची माहिती जाणून घेणार आहोत. हे पीक म्हणजे कुळीथ चे पीक. अनेक जण यास हुलगी म्हणून देखील ओळखतात.

शेतकरी जर पारंपरिक पिकांऐवजी इतर पिकाच्या लागवडीच्या शोधात असले तर कुळीथ हा एक उत्तम पर्याय आहे.

जमीन

  • माळरानाची, हलकी, उथळ, कमी सुपीक जमिनीमध्ये हे पीक अधिक उत्तम येते.
  • भारी तसेच चुनखडी असलेल्या जमिनीमध्ये हे पीक घेणे टाळावेत.
  • माध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये पावसावर हे पीक चांगले येते.
  • अन्नद्रव्ये कमी असणाऱ्या हलक्या जमिनीमध्ये हे पीक घेता येते.
  • जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेणखत तसेच कंपोस्ट खताचा वापर करावा.

हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

बियाणे आणि पेरणी तंत्रज्ञान

  • प्रति हेक्टर प्रमाणे १२ ते १५ किलो बियाणे लागतात.
  • पावसाळ्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर वापसा येताच जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कुळिथाची पेरणी पूर्ण करून घ्यावी.
  • पेरणी करतांना २ ओळीतील अंतर ३० सेमी तर २ रोपातील अंतर १० सेमी ठेवावेत.
  • हे पीक तसे पहिले तर पूर्ण पावसावर देखील घेता येते.
  • पावसाने फुले येण्याच्या तसेच शेंगा भरण्याच्या काळामध्ये जास्त ताण दिला तर त्याचा उत्पादनावर वाईट परिणाम होतो.
  • हे पीक सुधारित पद्धतीने घेतल्यास अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते तर त्यातून अधिक नफा मिळवता येतो.

हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

पीक व्यवस्थापन

  • या पिकाची पेरणी करतांना पिकास १५ किलो नत्र , ३० किलो स्फुरद इतकी खतांची मात्रा मिळण्यासाठी प्रति हेक्टर प्रमाणे ७५ किलो डायअमोनियम फॉस्फेट द्यावे.
  • आंतरमशागत वेळोवेळी करणे गरजेचे आहे.
  • ढगाळ वातावरणामुळे मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पाने खाणार्‍या किडींचा प्रादुर्भाव दिसला तर या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० % प्रवाही,५०० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टर प्रमाणे फवारावेत.
  • कुळिथाची काढणी केल्यानंतर उन्हामध्ये चांगले वाळवून पोत्यामध्ये किंवा कोठीत साठवून ठेवावेत.

शेतकरी जर पारंपरिक पिकांऐवजी इतर पिकाच्या लागवडीच्या शोधात असले तर कुळीथ हा एक उत्तम पर्याय आहे.

हे ही वाचा (Read This ) एका एकरात करा या झाडाची लागवड, नक्कीच बनवेल करोडपती

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *