भातावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव : वेळीच उपाययोजना करा.

Shares

 सदयस्थितीत पुर्व विदर्भात चंद्रपूर जिल्हयात सिंदेवाही व पोंबुर्ना तालुक्यातील काही ठिोकणी मध्यम ते जास्त प्रमाणात, भंडारा जिल्हयाच्या लाखंदूर व साकोली तालुक्यात तर गडचिरोली तालुक्यात धानावर लष्करी अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन आला आहे. सध्या पुर्व विदर्भात भात पिकाची लावणी आटोपुन पिक फुटवे अवस्थेत आहे. पावसाच्या दिर्घ उधाडीनंतर दमदार पाऊस असे वातावरण या किडीस पोषक असुन गवत वर्गीय पर्याई खादय वनस्पती सर्वत्र मोठया प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.

ओळख : या अळीचा पतंग मध्यम आकाराचा १-२ सें.मी. लांब असून समोरील पंखा गडद पिंगट व त्यावर काळसर ठीपका आणि कडेवर नागमोडी पटटे असतात. पुर्ण वाढलेली अळी २.५-४ सें.मि. लांब, लठ्ठ, मऊ, हिरवी, काळी आणि यमुनानकोष अंगावर लाल पिवळसर उभ्या रेषा | असतात. मादी २००-३०० अंडी समुहाने, | पुजक्याच्या स्वरूपात धानावर/गवतावर घालते. अंडी करडया रंगाच्या केसांनी झाकलेली असतात. अंडी अवस्था ५-८ दिवस, अळी अवस्था २०-२५ दिवस व कोषावस्था १०-१५ दिवसांची असून कोष धानाच्या बुंध्या जवळील बेचक्यात/जमीनीत आढळतात. लष्करी अळीची एक पिढी पुर्ण होण्यास ३० ते ४० दिवस लागतात.

O लष्करी अळी ढगाळ वातावरणात विषेशत: रात्रीच्या वेळी धानाचे शेंडे व खोडावर हल्ला करून फस्त करते. त्यामुळे झाडाची धस्कटे शिल्लक राहतात. पीक लॉबी अवस्थेत असतांना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोब्या कुरतडल्यामुळे शेतात लोंब्यांचा सडा पडलेला आढळतो.अळया रात्री कार्यक्षम असुन दिवसा धानाच्या बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात. प्रौढ पतंग रात्रीच्या वेळी सक्रीय राहून त्यांचे मिलन होते व मादी पतंग अंडी देण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमण करतात. पतंग दिवसा ढेकलाखाली किंवा झाडाच्या खालच्या बाजुला लपुन राहतात. कोष झाडावर किंवा बाधीवरील गवतामधे असतात.

प्रादुर्भाव कसा ओळखावा
अळया पानाचे शेंडे व कडा कुरतडते. संपुर्ण कुरतडल्यानंतर पान कापून टाकते किंवा पानाची मध्य शिरच शिल्लक ठेवते. अळयांची संख्या जास्त असल्यास पिकाचे नुकसान संभवते व अळया कमी वेळात संपूर्ण झाड उध्दस्त करून टाकते. उद्धेकीय स्थितीत अळया मोठ्या प्रमाणात समुहाने एका बांधीतून दुसऱ्या बांधीत पिक उध्दस्त करत पुढे सरकतात.

आर्थीक नुकसानीची पातळी.:-४ ते ५ अळया प्रति चौ.मी.

एकात्मिक व्यवस्थापन
१. पतंगाच्या टेहाळणीसाठी प्रकाश सापळयांचा वापर करावा. सायंकाळच्या वेळी ७.०० ते ९.०० वाजता चे दरम्यान प्रकाश सापळे लावावे व सापळयात पतंग दिसल्यास त्वरील नियंत्रणाचे उपाय योजावे.
२. शेतांचे बांध स्वच्छठेवावे म्हणजे अळयांना खादय उपलब्ध होणार नाही व त्यांना लपण्यास जागा मिळणार नाही.
३. अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास चुडात किंवा जमिनीवर दिसणाऱ्या अळ्या, गोळा करून नष्टकराव्या.
४. बांधीत पाणी भरावे त्यामुळे अळया पाण्यात बुडून मरतील.
५. पिकावरून दोर किंवा झाडाच्या फांदया आडव्या फिरवून लष्करी अळया पाडाव्यात.
६. बेडकांचे संवर्धन करावे. कारण बेडूक अळया खातात.
७. नांगराने खोल नाली पाडून त्यामधे पाणी भरावे, म्हणजे अळया शेजारील बांधीत चाल करून ___ जाणार नाही. अळयांचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव असल्यास हि पध्दत फायदेशीर ठरते.
८. प्रादुर्भावग्रस्त बांधीमधुन सुद्रुढ बांधीत अळयांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन बांधीच्या आजुबाजुला जवळपास ४० ते ५० फुटाच्या पट्ट्यात रासयनिक किटकनाशकांची फवारणी करावी.
९. रासायनिक किटकनशकाची फवारणी प्रामुख्याने सायंकाळच्या वेळी केल्यास प्रभावी ठरते कारण अळया रात्रीच्या वेळी सक्रीय होऊन मोठया प्रामणावर नुकसान करतात.
१०. लष्करी अळीचे नियंत्रणासाठी आर्थिक नुकसान पातळीवर आधारीत डायक्लोरव्हास ७६ टक्के प्रवाही या किटकनाशकाची १२.५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *