ब्लॉग

माती मधला पडद्यामागचा हीरो – जिवाणू

Shares


नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आपण माती ला आई मानतो पण माता या मानानं आपण तिची सेवा काहीच करत नाही आहे.फक्त पीक काढायची!आपन फक्त आपला हेतू साध्य करत आहे.पण एक अदृश्य शक्ती आहे तिचे रक्षण करण्यासाठी आपल्या जवळून एक पैसा न घेता दिवस रात्र काम करणारा जमिनीतील पडद्यामागील हीरो म्हणजे जिवाणू,माय मातीच्या कुशीत राहुन मातीला जिव लावणारा घटक म्हणजे जिवाणू ! आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या अतीसुक्ष्म असणारा या निसर्गतःच जमिनीमध्ये असंख्य सूक्ष्मजीव वास्तव्य करीत असतात. त्यामध्ये जिवाणू, बुरशी आदींचा समावेश असतो. हे जिवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्ये व अन्न घटक वितरणाचे व उपलब्ध करण्याचे कार्य करतात.

हे ही वाचा (Read This ) शेती मधे तंत्रज्ञानाची सांगड

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर जमिनीतील फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढविणे महत्त्वाचे आहे.फायदेशीर जिवाणूंमध्ये रायझोबियम, ऍझोटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरिलम,हे सर्व फ्री मध्ये काम करुन आपल्याला जे जमिनीतून उत्पन्न देतात ते फक्त आणि फक्त जीवणूमुळेच मिळते,ही मातीत बुरशी असते, जी असते आणि ते पदार्थांच्या विघटनात महत्त्वाची भूमिका बजावतात. हानिकारक पदार्थांचे पोषकतत्त्वांमध्ये रूपांतर करणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे कंपोस्टिंग,जी पूर्णपणे जैविक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये वातावरणीय परिस्थितीत बुरशीद्वारे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते.

हे ही वाचा (Read This ) सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणीकरण महत्वाचं – एकदा वाचाच

बुरशी कुजलेल्या पदार्थांच्या विघटन क्रियेद्वारेच कंपोस्ट तयार करण्यास मदत करतात. आपले पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी आणि माती सुपीक करण्यासाठी ते शेतकऱ्यांचे मित्र म्हणून ओळखले जातात.पण आपन त्यांना शत्रू समजतो रसायनांचा वापर करून आपन त्या अस्तित्व नष्ट करत आहे व दुसरी गोष्ट म्हणजे पिकांचे अवशेष जाळल्याने त्यातील मुख्य पोषक घटक नष्ट होतो व जिवाणू च ही अस्तित्व धोक्यात येते.

 हे ही वाचा (Read This ) अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज…खूप महत्वाचं एकदा वाचाच

मित्र बुरशीद्वारे सेंद्रिय विघटन प्रक्रियेनंतर कंपोस्ट तयार करणं बंदच केले आहे.आपन फक्त शेती पाहत आहे माती नाही या गोष्टी कडे आपन दुर्लक्ष केले तर भविष्यात आपल्याला या गोष्टीची किंमत मोजावी लागेल यावर आपन विचार करणे आवश्यक आहे. आता हेच बघा ना की जीवाणू निसर्गातही मुक्तपणे आढळतात, परंतु त्यांचा वापर अधिक सुलभ व्हावा म्हणून ते कृत्रिमरीत्या तयार करून शेतकर्या पर्यत पाठवले जातात, जेणेकरून त्यांचा वापर करून पिकाचे नुकसान करणाऱ्या किडींपासून वाचवता येईल पण दुर्दैव इतकं की त्याही घटकांचा वापर आपण करतंच नाही.
आपल्याला फुकटात मिळालेल्या गोष्टीचा फायदा आपन घेतच नाही.वैचारीक व्हा आता नाही तर केव्हाच नाही.
धन्यवाद.

विचार बदला जिवन बदलेल
Save the soil all together

मिलिंद जि गोदे
9423361185

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *