शेती मधे तंत्रज्ञानाची सांगड

Shares

नमस्कार शेतकरी बांधवांनो

शेती हा व्यवसाय म्हणून उत्तम पद्धतीने व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जर आपन आत्मसात केली तर आपला वेळ व पैसा दोन्ही वाचलं! हाच विषय शेतकर्या पर्यंत पोहचवण्यासाठी के व्ही के घातखेड यांच्या माध्यमातून शेती मधे नवीन स्वयमचलित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपन कसे अवगत करावे हा मुद्दा श्री राजेश राठोड सर यांनी शेतकर्याना समजावले.आपन शेती ही विस ते तिस वर्षापूर्वी पारंपरिक म्हणजे बैलं जोडी च्या मदतीने करत होतो जसजसा काळात बदल होत गेला तसा आपनही शेती मधे बदल केला.पण आपन कोठेतरी कमी पडतं आहे हे लक्षात घेऊन राठोड सर यांनी माहीती देत शेती मधे कोणत्या वेळी कोणते उपकरण वापरले पाहिजे जसे पेरणी करताना कोणत्या यंत्रांची पेरणी पद्धती वापरली पाहिजे त्या मुळे वेळ व पैसा वाचवण्यासाठी मदत होईल.

हे ही वाचा (Read This अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज…खूप महत्वाचं एकदा वाचाच

जसे बि बि एफ(सरी वरंबा पद्धत) त्याच बरोबर ट्रॅक्टर कल्टिवेशन त्यामधले प्रकार कोणते या सर्व गोष्टी शेतकरी यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितले. आताच्या काळात मजुराचाअभाव या सर्व गोष्टीचा फरक शेतीवर होते.नवीनतम शेती ला लागणारी औजारे व यंत्रे यांच्या वापराचा फायदा सांगुन शेतकरी बांधवांना  प्रवृत्त करणे आज आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पीक काढणी पश्चात कामांकरिता सुध्दा शेती मध्ये लागणार्या औजारांची जोड दिली तर पीकाच मशागत करून शेतीमधून मिळणारा फायदा व ज्ञानाची वाढ होते.आपल्या शेतीचा विचार करता शेती पारंपारिक पध्दतीवर व पावसावर अवलंबून त्यामुळे येणाऱ्या काळात कोरडवाहू व बागायती शेतीसाठी आवश्यक असे आधुनिक शेती औजारे व यंत्रे उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा लागणार आहे.

हे ही वाचा (Read This बदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे

थोडक्यात व महत्वाचं म्हणजे आपणास शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी सर्वच स्तरावरून मोठया प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत व हि काळाची गरज आहे.आपल्या शेती मधे कमी उत्पादन होत आहे व जास्त खर्च हे आजच्या शेतीचे चित्र आहे. शेतीत बदल घडवून आणण्यासाठी अभियांत्रिकीच्या दृष्टीने मोठया प्रमाणात प्रयत्न महत्त्वाचे आहे. आपल्या ग्रामीण भागात शेतकरी हा अल्पभूधारक आहे त्यामुळे नविन यंत्र खरेदी करणे परवडणारे नाही त्या साठी ही उपाय म्हणजे शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती ला लागणारे उपकरणे विकत घेतली जाऊ शकते.स्वयमचलीत कींवा बैलजोडीवरचे नविन पेरणी यंत्र या मुळे शेती काम लवकर होण्यास मदत मिळेल.शेतीमधे कोणत्याही पद्धतीने फवारणी करणे सोपे जाईल व भविष्यात सुद्धा ही शेती हायटेक होईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही…

धन्यवाद मित्रांनो

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

मिलिंद जि गोदे

Save the soil all together

9423361185

हे ही वाचा (Read This सावधान! शेती संपावर जाणार आहे

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *