सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणीकरण महत्वाचं – एकदा वाचाच

Shares

नमस्कार शेतकरी बांधवांनो,

आपल्याला शेतीच्या हीतासाठी व सेंद्रिय शेती च्या बाबतीत या सर्व येणाऱ्या आव्हानाच उत्तर शोधण्यासाठी हा मार्ग व शेवटचा उपाय म्हणजे सेंद्रिय शेती होय . आज शेतकरी सेंद्रिय शेती करत आहे.शेती पद्धतीत बदल जसे जैविक निविष्ठा,भूसुधारक पीक जसे हीरवळीचे खते व संरक्षण निविष्ठा मध्ये सेंद्रिय निविष्ठांचा वापर व निर्मितीही शेतकरी स्वत: करू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी कोणत्याही रसायनावर अवलंबून राहावयाची गरज नाही पन बाजारात शेती माल विकताना आपन सेंद्रिय माल या नावाने विकतो या गोष्टी काही पुरावा पाहीले की आपला माल सेंद्रिय शेती मधुनच तयार झालेला आहे या साठी एक प्रणाली आहे ती म्हणजे प्रमाणीकरण हे महत्त्वाची भूमिका बजावतं.

हे ही वाचा (Read This अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज…खूप महत्वाचं एकदा वाचाच

आपन आज सेंद्रिय शेती करत आहे पण त्या गोष्टी ला आधारच नाही त्या शेती ला सेंद्रिय शेती कोण म्हणेल व कोण माल विकत घेईल.आता पाहू सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची गरज सेंद्रिय शेती ला का आहे व हे  प्रमाणीकरण काय आहे? प्रमाणीकरण केव्हा कराव लागते ? सेंद्रिय शेतीची मानके कोणती ?सेंद्रिय शेती प्रमाणीकरण प्रकार कोणते? प्रमाणीकरण यंत्रणा आणि सेंद्रिय शेतीसाठी पि जि एस( Participatory Guarantee System for India) सर्टिफिकेशन आदीं बाबींची माहिती आपन आपल्या लेखाच्या माध्यमातून उलगडा करूया!प्रमाणीकरण म्हणजे काय ? साध्या भाषेत सांगायाचे झाले तर सेंद्रिय उत्पादने काढणारा शेतकरी व सेंद्रिय शेती चा उत्पादित माल विकत घेणारा ग्राहक यांच्यामध्ये एक प्रकारचा सेंद्रिय मालाच्या बाबतीत विश्वास  निर्माण करणारी संस्था व यंत्रणा  ग्राहकांची फसवणूक न होणे व शेतकऱ्यांना देखील त्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय मालाला योग्य भाव ग्राहकांपासुन मिळण्यासाठी त्यांच्या सेंद्रिय शेती पद्धतीचे प्रमाणीकरण करून देणे ह्या पद्धतीत उत्पादित मालातील घातक रसायने व घटकांची पातळी मोजून तिचे प्रमाण ठरविणे.

हे ही वाचा (Read This पिकं वाढीसाठी मुलद्रव्य ची ओळख – एकदा वाचाच

आज आपल्याला रासायनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम आपल्याला दिसतच आहेत आज आपन  कोणत्याही पदार्थाचे जेव्हा सेवन करतो, तेव्हा आपल्या आरोग्यास त्यामधील विषारी द्रव्ये, घटक यामुळे हानी पोहचण्यासाठी शक्यता असते. अशा द्रव्याची चाचणी करून त्यांचे प्रमाण या पद्धतीने मोजले जाते.सध्याच्या प्रचलित असलेली रासायनिक शेती पद्धतीमध्ये रासायनिक खते, किटकनाशके बुरशी नाशके मोठया प्रमाणात वापरली जात आहेत. या घटकांचे अंश मोठया प्रमाणात जमिनीमध्ये पाण्यामध्ये व वातावरणात तसेच अन्य पदार्थातमधे उतरत आहेत अशा जमिनीतून तयार होणारे उत्पादन हे सर्वांच्या आरोग्यास धोकादायक आहे या मुळे सजीव जातीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते.या उलट सेंद्रिय शेती प्रमाणीकरण पद्धतीमध्ये शेती माल अशा पद्धतीने उत्पादित केला जातो की, ज्यामध्ये अशा हानिकारक घटकांचे प्रमाण नैसर्गिकरित्या येणारच नाही.

हे ही वाचा (Read This कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न

तर परिसरातील जैव विविधता उत्पादित मालाचे वैविध्य गुणधर्म, वास, चव, रंग, टिकाऊपणा हे पारंपारिकच राहतील म्हणजेच सेंद्रिय शेती प्रमाणीकरणामध्ये संबंधित यंत्रणेचे शेतमाल उत्पादक पद्धतीची प्रमाणित मानके ठरवून दिलेली आहेत जर अशा मालास सेंद्रिय शेती उत्पादन म्हणून प्रमाणीकरण शेती करण्याची पद्धती ठरवून दिलेली आहे. यानुसार उत्पादीत होणारा माल हा प्रमाणित उत्पादीत होत असतो याच गोष्टी ला प्रमाणिकरण म्हणतात. आता हेच पहा विदेशातआरोग्यास हानी पोहोचविणाऱ्या किटकनाशकवर बंदी असून त्या गोष्टी ची योग्य अंमलबजावणी केली जाते. मात्र आपल्या कडे वेगळचित्र आहेआपल्याकडे अशा औषधांवर बंदी असून देखील राजरोसपणे ती शेतात वापरली जातात यावर कटाक्षाने बंदी आणणे गरजेचे व अत्यंत महत्वाचे आहे.आता सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची गरज का आहेसेंद्रिय शेती म्हणजे निसर्गाने जे आपणास दिले आहे ते निसर्गाला परत करणे म्हणजेच सेंद्रिय शेती होय.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो अधिक उत्पादनासाठी जाणून घ्या या ६ महत्वाच्या टिप्स

अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून त्यामुळे शेतीचे उत्पादनात वाढ जरी होत असली तरीही यातून उत्पादित होणारा माल हा विषारी तयार होत असल्यामुळे जीवाला यापासून मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीत विषमुक्त व रसायनविरहित अन्नधान्य, भाजीपाला पिके घेणे आवश्यक असून त्याचे प्रमाणीकरण यंत्रणेकडून तपासणी करून उत्पादीत सेंद्रिय माल ग्राहकांना विक्री करण्यासाठी सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची नितांत गरज असल्याचे स्पष्ट होते.  प्रमाणीकरण का करावे ?ग्राहकांमध्ये सेंद्रिय उत्पादनाविषयी विश्वासार्हता वाढविण्यासाठी आपल्या शेतीचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असते. हे करीत असतांना प्रमाणीकरण संस्था शेती पद्धतीचे विषयी संशय असल्यास त्या शेतातील माती, पाणी, फळे आदींच्या प्रयोगशाळेमध्ये चाचण्या घेण्यास सांगते उत्पादित मालास हानिकारक द्रव्यांची पातळी तपासून पाहते व त्याप्रमाणे प्रमाणिकरणाचा निर्णय घेते थोडक्यात आपल्या शेतातून तयार तयार होणाऱ्या अन्नधान्यामध्ये किती प्रमाणात कोण-कोणते विषारी घटक आहेत ते कळते जर हे घटक मर्यादीत स्वरूपात असतील तर योग्य मात्र अधिक प्रमाणात असतील तर त्याचा आरोग्यावर होणारा परिणामही तेवढाच घातक ठरणार आहे.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

शिवाय या घटकांचा परिणाम नुसताच आरोग्यावर होत नाही तर पर्यावरण, हवा, पाणी, माती, जीवजंतू, झाडे, पशुपक्षी या सर्वच घटकांवर होत असतो व त्यामुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढते आहे. नैसर्गिक निविष्ठांचा वापर शेतीत केल्याने जमीन सजीव होऊन विषमुक्त व दर्जेदार शेतमाल उत्पादित करता येतो.प्रमाणिकरणाचा दुसरा फायदा म्हणजे आपल्या शेतमालाचा दर्जा, प्रत आपणास माहिती होते व अशा मालास सुरक्षिततेमुळे ग्राहक जास्त दर देण्यास तयार होतात. अशा मालास देशान्तर्गत मोठी बाजारपेठत सुद्धा प्रचंड मागणी आहे. प्रमाणीकरणामुळे उत्पादीत मालाविषयी ग्राहकास कोणत्याही प्रकारची शंका अथवा गैरसमज उद्भवणार नाहीत आणि सेंद्रिय उत्पादीत मालाची विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकेल.सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यंत्रणासेंद्रिय शेतीपद्धतीचे प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था व बिगर शासकीय यंत्रणा असतात. प्रमाणीकरण यंत्रणांना मान्यता देण्यात आली आहे.इकोसर्ट-इंटरनॅशनल कोरस्टर स्ट्रे 87 डी-37520,

ओस्टॉरोड,जर्मनीभारतातील कार्यालय-औरंगाबाद (महाराष्ट्र)


एस.जी.एस.इंडिया प्रा.लि.250,उदयोगविहार,फेज-4 गुरगाव (हरियाणा)


इन्डोसर्ट इंडियन ऑरगॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी,केरळ


सर्ग विकास समिती नैनीतालनोका, पुणेसेंद्रिय शेतीच्या राष्ट्रीय मानकांची सखोल तपासणी व पूर्तता करणे ही प्रमाणीकरण संस्थेची मुख्य जबाबदारी आहे. तसेच त्यांना सेंद्रिय मालाच्या उत्पादनाला शेतकऱ्याला द्यावयाचे आवश्यक प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत.प्रमाणीकरणासाठी आवश्यक बाबी  माती व पाणी तपासणी करणेसेंद्रिय शेतीसाठी जमीन तयार करणेपेरणी लागवडी बियाणेसेंद्रिय शेतीच्या निकषानुसार पेरणी  व लागवड करणे जैविक कीड-रोग नियत्रंकांची निर्मिती व वापर सेंद्रिय मानकानुसार शेतकऱ्यांना तयार करण्यास मार्गदर्शनखुरपणी, कोळपणी व तणांचा चा बंदोबस्त करणे.काढणी व साठवण करणे. प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे अशा शेतीची पाहणी व प्रमाणीकरण करणे महत्त्वाचे आहे प्रमाणीकरण केव्हा करावे ?आपल्या शेतीचे प्रमाणीकरण करून घेणे हे आपल्या हिताचे आहेच. शिवाय असे प्रमाणीकरण योग्य वेळी केल्यास त्यासाठी होणारा खर्च कारणी लागू शकतो.

हे ही वाचा (Read This शेतीसाठी उपकरणे खरेदी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, शेतकऱ्यांना मिळतोय ५० ते ८० टक्केपर्यंतचे अनुदान मिळणार

सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीने सलग 3 वर्ष पिके घेणे महत्वाचे आहे. परंतु संबंधित शेतकऱ्यांचा अर्ज प्रमाणीकरणासाठी घेण्याचा निर्णय प्रमाणीकरण संस्थेने घेतल्यांनतर हा तीन वर्षाचा कालावधी सुरू होतो. याचा अर्थ आपण गेल्या तीन वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने जरी शेती करीत असल्यास आपण तीन वर्षानंतर प्रमाणीकरण संस्थेकडे प्रमाणीकरणासाठी अर्ज केला तर हा अर्ज संस्थेला मिळाल्यापासून पुढील तीन वर्षाचा काळ प्रमाणीकरणासाठी मोजला जाईल. अशाप्रकारे आपले तीन वर्ष वाया जातील याचा अर्थ आपण ज्या वर्षी आपण सेंद्रिय शेती पद्धत अवलंबणार आहोत. त्याच वर्षी प्रमाणीकरण संस्थेकडे अर्ज पाठविणे केव्हाही उचित ठरेल सेंद्रिय शेती गेल्या तीन वर्षापासून करीत आहात याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.ढोबळमनाने चालू वर्षापासून सेंद्रिय शेतीच्या मानकानुसार शेती करण्यास सुरूवात केल्यानंतर तीन वर्षानंतर होणारे धान्य किंवा फलोत्पादन हानिकारक घटकांपासून मुक्त होऊ शकते. प्रमाणीकरण प्रक्रियेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा सेंद्रिय शेती पद्धतीच्या कालावधीनुसार प्रमाणीकरण संस्था प्रमाणपत्र देते….. 

*PGS green 🍏**PGS organic 🍃**ही दोन्ही प्रमाणपत्र**मला सेंद्रिय शेती मध्ये मिळाले

धन्यवाद मित्रांनो

ध्यास सेंद्रिय शेती चा

Save the soil all together

मिलिंद जि गोदे

milindgode111@raajkisan

हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *