अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज…खूप महत्वाचं एकदा वाचाच

Shares

नमस्कार मंडळी आपन नविन शेती तंत्रज्ञान आत्मसात का करत असताना अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज बनली आहे. आपला शेतीमध्ये अभ्यास म्हणजे असे नाही कि, सतत पुस्तके घेवून व शेतामध्ये जाऊन अभ्यास केला पाहिजे आणि त्या अभ्यासानुसार शेती केली पाहिजे. आपल्याला पुस्तकांमधून माहिती मिळते हे खरे आहे. परंतु काही गोष्टी सर्वांनाच वेळेवर उपलब्ध होतील असे नाही. तसेच पुस्तकी ज्ञान सर्वांनाच समजेल असेही नाही! कारण शेती हा एकमेव विषय आहे तो प्रात्यक्षिक आहे.

अनेक वेळा आपण आपल्या शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतो. त्यात काही पिकांमध्ये आपन नविन पद्धती चां वापर करत असतो. त्या पिकांत आपल्याला काही वेगळे बदल दिसतात. परंतु काही ठिकाणी पिकं बदल होताना दिसत नाही. त्याच बरोबर शेती ही काही आपल्याला नवनविन शिकवत असते कारण शेती हा व्यवसाय हा बदलाचा विषय आहे हे समजणे महत्त्वाचे आहे.

या क्षेत्रात नवीन होणारे बदल स्वीकारणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मागच्या वेळी घेतलेले पिक त्यात काही आपण चांगले करत असतो तर काही बाबतीत काही कमी जास्त राहून जातात. ज्यामुळे काही नुकसानीला ही सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टी शेती क्षेत्रात अभ्यासाच्या आहेत एका वेळी झालेली नुकसानी गोष्ट नंतरच्या वेळी टाळता आली पाहिजे. तेव्हा तो भाग होतो अभ्यासपूर्वक शेती करण्याचा.शेतीमध्ये अनेक प्रकारचे बदल हे काळानुसार स्वीकारले गेले पाहिजे.आता हेच पहा वातावरणात अचानक होणारे बदल त्यामुळे होणारे नुकसान या गोष्टी आज नाही होत आहेत. सातत्याने या बाबी होत आल्या आहेत आणि अजूनही होतच आहेत.

यावर काहीतरी अभ्यासपूर्वक उपाय शोधणे हे तुम्हा आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या घडवणे आपण टाळू शकत नाही. जे आपल्या हातातले आहे त्यात मात्र आपण बदल निच्छितच करू शकतो. निसर्गाला आपन आव्हान देऊ शकत नाही परंतु होणारे नुकसान टाळू शकतो किंबहुना होणाऱ्या नुकसानीचा दाह कमी करू शकतोशेतीत विविध शेती पद्धती आहेत त्यात बागायती शेती, कोरडवाहू शेती इत्यादी. तसेच विविध प्रकार आहेत शेतीचे त्यामुळे योग्य त्या गोष्टीची निवड झाली पाहिजे.

फळबागा लागवड वाढवली पाहिजे. बरेच असे फळबागा आहेत जे कुठल्याही जमिनीत येवू शकतात व चांगले उत्पादन देखील देवू शकतात. त्यामध्ये नगदी पिके घेता येतात. एखाद्या पिकाचे वातारण किंवा इतर काही कारणांमुळे नुकसान झाले तर दुसऱ्या पिकाचे उत्पादन मिळेल अशा रीतीने शेती पद्धतीत बदल होणे गरजेचे बनले आहे… धन्यवाद!


Save the soil all together
मिलिंद जि गोदे
शेती बलवान तर शेतकरी धनवान

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *