चांगला पाऊस सुरू झाल्यानं खरीप पिकांच्या पेरणीला वेग, शेतकऱ्यांचा कापूस पिकावर जोर

Shares

चांगला पाऊस सुरू झाल्यानंतर खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. पिकांना पुरेसा वेळ मिळावा आणि उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना आता पेरणीची कामे जलदगतीने पूर्ण करायची आहेत.

यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गतवर्षी जूनअखेरपर्यंत पेरणी केली होती, मात्र यंदा पाऊस लांबल्याने आजतागायत शेतकऱ्यांना योग्य पेरणी करता आली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनसोबतच मूग, तूर आणि उडीद ही मराठवाड्यातील प्रमुख पिके मानली जातात, मात्र आता मराठवाड्यातील शेतकरी केवळ सोयाबीनच्या लागवडीवर भर देत आहेत.

शाश्वत उत्पन्नाचे साधन बनतोय बांबू लागवड, शेतकऱ्यांना शासनही करतय मदत !

गेल्या काही वर्षांपासून डाळींना योग्य भाव मिळत नसल्याने, तसेच यंदा पाऊस लांबल्याने उडीद, मूग यांचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मराठवाड्यातील शेतकरी कडधान्ये सोडून कापूस पिकावर लक्ष केंद्रित करत आहेत. कृषी मंत्रालयाने १ जुलै रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीतही कापसाखालील क्षेत्र वाढल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता, त्यामुळे यंदा शेतकरी सोयाबीन लागवडीत वाढ करत असल्याचे चित्र आहे. सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील शेतकरी सोयाबीनची जोमाने पेरणी करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत जास्त पेरणी झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पावसाचा जोर वाढल्याने यामध्ये आणखी प्रगती अपेक्षित आहे. हवामान खात्याने शनिवारी 2 जुलै रोजी सांगितले की मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे आणि या महिन्यात चांगला पाऊस होईल.

जीवामृत बनविण्याची पद्धती, त्याचे फायदे

कृषी मंत्रालयाचा अहवाल काय म्हणतो?

कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार खरीप पिकांच्या पेरणीखालील क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत १५,७०,००० हेक्टरने कमी आहे. यामध्ये सर्वाधिक घट भात, ज्वारी, नाचणी, मका, भुईमूग आणि नायगर बियाण्याच्या क्षेत्रात दिसून आली आहे. यावर्षी १ जुलैपर्यंत २७८.७२ लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत २९४.४२ लाख हेक्टर होती. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना पेरणीसाठी अद्याप पुरेसा अवधी आहे. आता चांगल्या पावसाचा कालावधी सुरू झाला आहे, त्यामुळे पेरणीत अडचणी येण्याची शक्यता कमी आहे, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

शेळीपालन करणाऱ्या महिलांसाठी विशेष योजना सुरू, तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता !

भारतात, साधारणपणे नैऋत्य मान्सून 1 जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकतो. यावेळी मान्सून वेळेआधी दाखल झाल्याने प्रगतीही चांगली झाली होती. मात्र, पेरणीसाठी पाऊस झाला नाही. पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट हे खूप महत्त्वाचे आहेत. याच काळात सर्वाधिक पाऊस पडतो, जो पिकांसाठीही फायदेशीर ठरतो.

तुमच्या शहरतील पेट्रोल डिझलचा भाव जाणून घ्या SMS द्वारे, वाचा संपूर्ण माहिती

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *