आरोग्य

शेकडो आजारांना पळवून लावणारे कडुलिंब

Shares

रस्त्याच्या बाजूला अनेकदा तुम्ही कडुलिंबाचे झाड पहिले असेल. कडुलिंबाची चव कडू जरी असली तरी त्यामध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. जर तुम्हाला दाताशी वा हिरड्यांशी निगडीत कोणताही त्रास जाणवला तरी सुद्धा तुम्ही कडुलिंबाच्या काडीने दात घासण्यास सुरुवात करू शकता.

हे ही वाचा (Read This) summer special : उष्मघातापासून संरक्षण करणारे कैरीचे आरोग्यदायी पन्हे

कडूनिंबाचा अजून एक मोठा फायदा म्हणजे कडूनिंब हे ताप आणि सर्दी खोकल्यावर सुद्धा गुणकारी समजले जाते आणि जगभर घरगुती उपचार म्हणून कडूनिंबाचा वापर होतो. कीटकनाशक, रोगनाशक, खते म्हणून वापरण्यात येणाऱ्या कडुलिंबाचे अधिक फायदे आपण जाणून घेऊयात.

हे ही वाचा (Read This)  Summer Special : कोकम सरबताचे फायदे आणि रेसिपी

कडुलिंबाचे फायदे

  • शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी कडुलिंब उपयुक्त ठरते.
  • शरीरातील हानिकारक विषयुक्त पदार्थ बाहेर पाडण्यासाठी कडुलिंब मदत करते.
  • शरीरातील जंतू नाश करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जातो.
  • सौंदर्य प्रसाधनात कडुलिंबाचा वापर केला जातो.
  • केस गळती, डँड्रफ यांसारख्या केसाच्या अनेक समस्यांवर कडुलिंब फायदेशीर ठरते.
  • युरीन इन्फेकशन झाल्यास कडुलिंबाची पाने त्यावर उपयुक्त ठरते.
  • विविध प्रकारच्या त्वचा रोगावर कडुलिंब रामबाण उपाय आहे.

हे ही वाचा (Read This) Summer Special : घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय

  • कडुलिंब पोटा संबंधित समस्याचे निवारण करतो.
  • कडुलिंब दात , हिरड्यांच्या समस्यांना दूर ठेवते.
  • अनेक इन्फेकशन पासून बचाव होण्यासाठी कडुलिंब मदत करते.
  • साप चावल्यास प्रथमोपचार म्हणून कडुलिंबाचा वापर केला जातो.
  • वजन कमी करण्यास कडुलिंब साहाय्य करते.

हे ही वाचा (Read This) Summer Special : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी प्या नारळपाणी

  • कडुलिंबाच्या तेलाचा उपयोग केस वाढण्यासाठी व चमकदार होण्यासाठी तसेच सूज आल्यास केला जातो.
  • जर तुमच्या त्वचेवर कोणते इन्फेक्शन झाले आहे आणि तुम्हाला त्यावर योग्य उपाय माहित नसेल वा ते नक्की कोणते इन्फेक्शन आहे हे कळत नसेल तर त्वरित कडुलिंबाची पाने घेऊन त्यावर चोळल्यास फायदा होऊ शकतो.

कडुलिंब हे वृक्ष सहज उपलब्ध होत असले तरी अनेक शेतकरी त्याची लागवड शेतजमिनीच्या चारही बाजूने करतात. कडुलिंबाचे वृक्ष सावली देण्याचे काम देखील करते.

हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *