दुष्काळात तेरावा महिना: वीज भारनियमनाचा शेतकऱ्यांवर परिणाम,पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Shares

यंदा दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यामुळे भाजीपालक उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. मार्च महिन्यापासूनच उष्णता वाढतांना दिसत आहे. त्यामुळे अश्या स्थितीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पिकाचं रक्षण कसं करावं, असा प्रश्न पडत आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे महावितरणकडून सातत्याने वीजेचं भारनियमन केलं जात आहे.

पिकांना पाणी देण्यासाठी लाईटच उपलब्ध नसल्यामुळे हाता-तोंडाशी आलेला भाजीपाला नष्ट होत आहे. त्यातच येत्या मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नांदेडमध्ये सिंचनासाठी लाईट उपलब्ध नसल्याने मिरचीच्या पिकांवर रोग पसरलाय.

हे ही वाचा (Read This) काळ्या हळदीची लागवड करून मिळवा ‘पिवळ्या’ हळदीपेक्षा १० पट भाव

मिरचीच्या पिकावर रोग

बाजारात हिरव्या मिरचीला एका किलोला शंभर रूपायापर्यंतचा भाव मिळतोय. मात्र वाढत्या उष्णतेपाठोपाठ सिंचनाला लाईट मिळेनाशी झाली आहे. मिरची उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. वाढत्या उन्हासह लोडशेडिंगचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचनासाठी लाईट उपलब्ध नसल्याने मिरचीच्या पिकांवर रोग पसरलाय. त्यामुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

हे ही वाचा (Read This) गुलखैरा शेती : या औषधी वनस्पतीचा लागवड करून कमी दिवसात दुप्पट नफा मिळवा

तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता

मार्च , एप्रिल महिन्यापासून तापमानात वाढ होतांना दिसत आहे. तर मे महिन्यात मराठवाड्यात अधिक तापमान वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच पिकाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा (Read This)  शेकडो आजारांना पळवून लावणारे कडुलिंब

सध्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. तर नांदेड, औरंगाबादने ४१ अंश सेल्सियस पार केले आहे. त्यात कोळशाच्या टंचाईमुळे भारनियमनाचे संकट राज्यावर घोंगावत आहे. असा स्थितीत पिकांची काळजी घेण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.तरी शेतकऱ्यांनी आता पासूनच पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा (Read This) मराठवाड्यातील देवस्थान उजळणार!

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *