व्वा रे पठ्या – ५ एकर कलिंगडाच्या उत्पन्नातून घेतले १३ लाख रुपये
कलिंगड सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात असून याला भाव देखील चंगला मिळत आहे. याच गोष्टींचा फिदा घेत एका बीएससी ऍग्री पर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने ७५ दिवसात १३ लाख ३२ हजार कमावले आहे. सागर प्रवीण पवार असे या तरुणाचे नाव आहे तो धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील तो रहिवासी आहे. त्याने ५ एकर शेतात कलिंगड घेतले, हे पिक त्याने आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने लावले. त्याची दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे 55 हजार रोपांची लागवड .
हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र
आठ ते दहा दिवसांच्या अंतराने कलिंगडाला खतांची मात्रा देण्यात आली. याचाच परिणाम म्हणून केवळ पंच्याहत्तर दिवसातच कलिंगड बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून यातून सागरला तब्बल 13 लाख 32 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र हे कलिंगड स्थानिक बाजारपेठेत विकण्याऐवजी दिल्लीच्या व्यापाऱ्यांशी त्याने संपर्क साधून विविध देशातील बाजारपेठेत कलिंगड विक्रीसाठी पाठवले. पिकाचे केलेले योग्य नियोजन आणि मार्गदर्शन यामुळे सागरने यावर्षी कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
हे ही वाचा (Read This शेतीसाठी उपकरणे खरेदी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, शेतकऱ्यांना मिळतोय ५० ते ८० टक्केपर्यंतचे अनुदान मिळणार
सागरने सात ते नऊ जानेवारी दरम्यान कलिंगडाची रोपे लावली. सात फूट अंतरावर यांत्रिक पद्धतीने ही लागवड करण्यात आली. पिकांच्या उष्णतेसाठी तीन ते चार टन कोंबडी खत वापरण्यात आले. त्यासोबतच मायक्रोन मल्चिंग पेपरचा वापर करत प्रति एकरी सुमारे आठ हजार रोपांची लागवड केली. हा पेपर वापरल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होण्यास मदत झाली. वेलवर्गीय पिकांवर व्हायरस तुडतुडे मावा या रोगांचा प्रादुर्भाव होतो हा रोखण्यासाठी त्याने चिकट फळमाशी, लिमडा, नीम ऑईल याचा वापर केला. सागरने पिकवलेल्या कलिंगडाला दिल्ली मुंबईसह गुजरातमधील व्यापाऱ्यांचा ही उत्तम प्रतिसाद मिळत असून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवनवीन प्रयोग केल्यास यश नक्की मिळते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा (Read This ) कमीत कमी पाण्यात करा या पिकाची लागवड, मिळवा भरगोस उत्पन्न