शेतीसाठी यंत्र पाहिजेत? मग राज्य सरकारच्या या योजनेबद्दल नक्की वाचा

Shares

आजकालच्या काळात शेतकरी हे शेतीसाठी मनुष्य बळ वापरण्याच्या ऐवजी, वेगवेगळ्या यंत्रांचा वापर आपल्या शेताच्या कामासाठी करताना दिसतात. ज्या शेतकऱ्यांकडे यंत्र नसतील अशांसाठी सरकारने यांत्रिकरणासाठी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे अधिक सुखकर आणि सोयीची व्हावी यासाठी ही योजना राबवित आहेत. राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना शेतीची कामे कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना ५०%, तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देते आहे.

या योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्राच्या /अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य्य घेऊन लाभ घेता येईल-
१. ट्रॅक्टर
२. पॉवर टिलर
३. बैल चलित यंत्रे/अवजारे
४. फलोत्पादन यंत्र/अवजारे
५. स्वयंचलित यंत्र
६. काढणी यंत्र
७. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
८. ट्रॅक्टरची अवजारे
९. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे.

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या आणि वेगवेगळ्या जमीन मशागतीच्या यंत्र आणि अवजारांसाठी अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे :-

१.पॉवर डटलर
२. टिॅक्टर/पॉवर डटलर चडलत

अवजारे
१. २० बीएचपी पेक्षा कमी नांगर
२. वखरमोल्ड बोडडनांगर

जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे :-
१. तव्याचा नांगर
२. चीजल नांगर,वखर
३. पॉवर वखर, बांड फॉमडर
४. क्रष्ट ब्रेकर, पोस्ट होल डगर, लेव्हलर ब्लेड
५. कल्टीव्हेटर (मोगडा)
६. रोटोकल्टीव्हेटर
७. डवड स्लॅशर
८. रीजर, रोटो पड्लर
९. केज व्हील
१०. बटाटा प्लान्टर पूर्वमशागत

आंतरमशागत यंत्रे :-
१. ग्रास डवड स्लॅशर
२. फरो ओपनर फरो ओपनर
३. पॉवर डवडर (२ बीएचपी पेक्षा कमी)

पेरणी व लागवड :-
१. रेज्ड बेड प्लांटर
२. न्युमॅडटक प्लांटर,
३. न्युमॅडटक व्हेडजटेबल सीडर, रेज्ड बेड प्लांटर इन्क्लाईन प्लेट व शेपरअटॅचमेंट
४. न्युमॅडटक व्हेडजटेबल ट्रान्सप्लांटर
५. पेरणी यंत्र / बियाणे खत पेरणी यंत्र (५फण )
६. बीज प्रक्रिया डिम
७. ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅरिअर/ एअर अडसस्ट)

पीक संरक्षण अवजारे :-
१. ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
२. ट्रॅक्टर ऑपरेटेड इलेक्टिो स्टॅडटक स्प्रेअर

काढणी व मळणी अवजारे :-
१. ररपर कम बाईंडर
२. कांदा काढणी यंत्र
३. भुईमुग शेंगा तोडणी यंत्र
४. बटाटा काढणी यंत्र
५. भुईमुग काढणी यंत्र
८. राईस चॉपर
९. ऊस पाचट कुट्टी
१०. कडबा कुट्टी
११. कोकोनट चॉपर स्टबल शेव्हर
१२. मोवर
१३. मोवर श्रेडर
१४. फ्लायल हारव्हेस्टर
१५. बहुपीक मळणी यंत्र
१६. भात मळणी
१७. उफणणी पंखा
१८. मका सोलणी यंत्र
१९. मोल्ड बोडनांगर

अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेबद्दल आपण कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळवू शकतो. अशा या फायदेशीर ठरणाऱ्या महत्वपूर्ण योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी नक्कीच घेतला पाहिजे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *