या सोप्या पद्धतीने करा उत्तम कंपोस्ट खत तयार !

Shares

उत्तम व जास्त उत्पादनासाठी शेतकरी सेंद्रिय, रासायनिक खतांचा वापर करत असतो. रासायनिक खतांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहत नाही. सेंद्रिय , नैसर्गिक खतांचा वापर केल्यास पीक चांगले येते, जमिन निरोगी राहते , उत्पादनात वाढ होते. आपण आज कंपोस्ट खत तयार करण्याच्या महत्वाच्या दोन पद्धतींची माहिती जाणून घेणार आहोत.
कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती –
बेंगलोर पद्धत –

१. बेंगलोर पद्धतीस खड्डा पद्धत म्हणून देखील ओळखले जाते.
२. या पद्धतीमध्ये १५ ते २० सेंटिमीटर सेंद्रिय पदार्थ व काडीकचऱ्याचा जाड थर पाणी शिंपडून गोळा केला जातो.
३. खड्डा भरून त्यावर सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत शेणमाती मिश्रण लिंपून घेतले जाते.
४. सेंद्रिय खत लवकर कुजावेत यासाठी अधून मधून पाण्याचा शिरकाव केला गेला पाहिजे.
५. अन्नद्रव्य वाया जाण्याचे प्रमाण या पद्धतीमध्ये कमी आहे.

इंदोर पद्धत –
१. इंदोर पद्धतीस ढीग पद्धत म्हणून देखील ओळखले जाते.
२. या पद्धतीमध्ये सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार ६ फूट रुंद, ४ ते ५ फूट उंच लांबी ठेवली जाते.
३. उरलेल्या पिकाचे अवशेष,शेण, काडीकचरा, शेतातील तण आदी सेंद्रिय पदार्थांचा थर तयार केला जातो.
४. या पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया ऑक्सिजनयुक्त वातावरणात उघड्यावर होते.
५. कुजण्याची प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी एका महिन्याच्या अंतराने ढीग वरखाली करून एकजीव केले जाते.
६. ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर पाणी शिंपडले जाते.
७. या ढिगावर प्लास्टिकचे आच्छादन टाकल्यास कुजण्याची प्रक्रिया जलद होते.
८. साधारणतः ३ ते ४ महिन्यांनी उत्तम कंपोस्ट खत तयार होते.

जमिनीची सुपीकता टिकून राहावी तसेच उत्तम उत्पादन व्हावे यासाठी कंपोस्ट खताचा वापर केला पाहिजे. कंपोस्ट खत नैसर्गिक असल्याने पिकास कोणतीही हानी होत नाही.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *