शेतीला समजणे महत्त्वाचे का आहे? एकदा वाचाच
नमस्कार मंडळी,
थोडं पण महत्वाचं आज खरी गरज आहे माती परीक्षण करण्याची! आपन शेतकरी वर्ग फक्त पिकांवर लक्ष केंद्रित करतो मातीवर नाही. शेतकरी आपल्या पिकांवर लागणार्या निविष्ठा जसे खत असो की किटकनाशक यावर वायफळ खर्च करतात.आपल्या विदर्भात जमिनीचे क्षेत्रफळ कमी आहे व अल्पभूधारक जे शेतकऱी भरपुर आहे व महत्वाचं म्हणजे कोरडवाहू शेती व खारपान पट्टा त्यातच शेती मधे नविन प्रयोग करण्याचे प्रश्नच येत नाही.
हे ही वाचा (Read This) जनावरांचे चारा व्यवस्थापन कसे करावे? एकदा वाचाच
बांधबंदिस्ताची योजना शासन राबवते त्या मधेही शेतकरी उत्साही नसतात सांगायचं झालं तर आपल्या कडील शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्याची सवय नाही.आपल्या कडे शेती मधे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती ती आता विविध कारणाने कमी होत आहे त्यामुळे जमिनीत पाणी म्हणावे तसे मुरत नाही. त्याच बरोबर दोन पावसातील अंतर जर १५ते२० दिवसांपर्यंत राहिल्यास त्याचा परिणाम थेट उत्पादन क्षमतेवर होतो आहे.
हे ही वाचा (Read This) शेतीसाठी गाळमाती वापरतांना काय घ्यावी काळजी?
आपन माती परीक्षण केले पाहिजे असे मला वाटते आपन माति मधल्या प्रमुख घटका त्याच बरोबरच सूक्ष्मद्रव्याची तपासणीची आवश्यकता आहे. सूक्ष्मद्रव्याची माहिती असणे तेवढेच महत्त्वाचे आहे पण काही शेतकऱ्याला ह्या गोष्टी ची माहिती नसते परंतु असे काही शेतकरी आहे ते योग्य पध्दतीने शेती करतात व त्या गोष्टी चा त्यांना लाभही मिळतो. खरीक पेरणी लगेच आपल्या शेतकऱ्याच्या समोर समस्या असते ती म्हणजे पिकांमध्ये वाढलेले तण कमी करण्याची. आमच्या भागातील शेतकरी वर्ग हा सरसकट प्रत्येक पिकासाठी तणनाशकाचा वापर करतो जातो.
हे ही वाचा (Read This) कडूलिंब: आपल्या संस्कृतींची ओळख, एकदा वाचाच
काही शेतकरी यांना खुरपण्याचा खर्च परवडत नाही त्यामुळे तणनाशकाचा वापर हा सर्रासपणे करतात पण ते अनभिज्ञ असतात कि आपण मारतेल्या तणनाशकांमुळे शेतीतील जिवाणू नष्ट होण्याचे प्रमाण भरपुर वाढत आहे.
आता हेच बघा पिकाच्या मुळाशी असणारे जिवाणू कीटकनाशक व तणनाशकामुळे नष्ट झाले आहे या सर्व गोष्टी चां परीनाम थेट परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. आपण समजून घेतले पाहिजे की शेतीचे म्हणून एक पर्यावरण आहे. या पर्यावरणात सर्व प्रकारचे घटक वर्षांनुवष्रे एकत्र राहतात. त्याची एक साखळी तयार होते. ती साखळी तोडण्याच्या घटना वारंवार घडत गेल्या तर त्याचा विपरीत परिणाम होतो व त्यामुळेच आपल्याकडील पिकाच्या उत्पादकतेत घट होत आहे.त्या मधे शेतकरी बियाण्या मधे होणार्या भेसळीची चिंता पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यास मोठी समस्या असते. काही ठिकाणी सरसकट भेसळ करतात त्यामुळे दुबार व तिबार पेरणीचे प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवतात. हे मि माझ्या डोळ्यांनी बघितले आहे.
साधे वाण,सरळ वाण व सुधारित वाण यातील खरेदी करताना कृषी सेवा केंद्रात जे सांगतो त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांना खरेदी करतात. आपल्याच घरचे बियाणे वापरावे हे कृषी विभाग वारंवार सांगतात.पण आपन तसे करत नाही.
हे ही वाचा (Read This) पशुसंवर्धन: उन्हाळ्यात प्राण्याला संसर्ग झाला आहे का ? ते असे तपासा
पूर्वी असलेली पद्धत आता नामशेष होत असल्याने अनेक अडचणींना तोंड देण्याची पाळी येते आहे. पेरणीची परीक्षा जवळ आलेली असताना पुरेशी पूर्वतयारी करण्यासाठी वेळ, पैसा उपलब्धता अशा अनेक कारणांमुळे प्रतिक्षेचा कालावधी वाढतो. त्यामुळे उत्पादनाचा निकाल काय लागणार हे ठरलेलेच असते. एकूणच निकालाची गुणवत्ता वाढली पाहिजे त्यादृष्टीने नियोजन करण्याची गरज असून सर्वाच्याच एकत्रित कृतीची गरज आहे.
घनता वाढवण्यासाठी ज्या बाबींची गरज आहे त्याची पूर्तता करण्याची योजना केली पाहिजे. शेतीत आता नवीन अभ्यासू नवं युवक येत आहेत. त्यांना योग्य पद्धतीचे मार्गदर्शन केले गेले व आपल्याला माती परीक्षणाची सवय जडली तर शेतीच्या उत्पादकतेत निश्चित वाढ होईल हे निश्चित.
धन्यवाद
हे ही वाचा (Read This) पेस्टीसाईडचा सुरक्षित वापर करणे आहे अत्यंत गरजेचे
शेती ला ज्ञानाची गती द्या..!
Save the soil all together
मिलिंद जि गोदे
9423361185
हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय