कांद्याचे दर कधी स्थिरावणार? जाणून घ्या आजचे दर

Shares


महाराष्ट्रामध्ये दरवर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर बुलढाणा जिल्ह्यात ८ हजार ९९३ हेक्टर क्षेत्र कांदा लागवडी खाली असून १ लाख ५३ हजार २१८ टन पर्यंत कांद्याचे उत्पादन मिळते. यंदा सर्वच चित्र बदललेले दिसत असून कांद्यास अगदी कवडीमोल दर मिळत आहे.


हे ही वाचा (Read This) 
 शेवगा लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न, सरकार देणार अनुदान

अधिक उत्पन्न मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. मात्र जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कांदा आला तेव्हा सरकारने निरुक्त बंदी केली त्यामुळे शेतकऱ्यांना लागवड खर्च निघणे देखील अवघड झाले आहे. त्याचबरोबर कांदा बियाणे महाग झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा खर्च झाला आहे.

हे ही वाचा (Read This)  खरीप हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार नाही, उन्हाळी सोयाबीन बहरले !

मागील २ महिन्यापूर्वी बाजारपेठेत कांदयाची विक्री ही ४० रुपये किलो प्रमाणे होत होती सध्या मात्र ७ ते १० रुपये किलो या भावाने विक्री होत आहे. होत आहे.तर कांद्यास ३०० ते १००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.

आजचे कांद्याचे दर

शासनाने कांदा खरेदी केंद्र सुरु करावेत अशी मागणी

यंदा शेतकऱ्यांनी १०० रुपये किलो प्रमाणे कांद्याचे बी पेरले. त्यात खताच्या किमतीबरोबर मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ झाल्यामुळे तो अधिकच खर्च वाढला. त्यात कांद्यास कवडीमोलाचा दर मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने नाफेड मार्फत कांदा खरेदी करावी. अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.

हे ही वाचा (Read This)  भारतीय गव्हाला जगात वाढली मागणी, एकूण 1 दशलक्ष टन गहू निर्यात, गव्हाला अजून चांगला दर मिळणार ?

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *