तीळ लागवड करा आणि फायद्यात रहा !

Shares

तिळाचे तेल आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचा औषधी तेल म्हणून सुद्धा वापर केला जाते. तिळाचे तेल खाणे आरोग्यासाठी चांगले असल्यामुळे या तेलाची बाजारपेठांमध्ये मागणी आहे.

महाराष्ट्रामध्ये तिळाची लागवड मुख्यतः रब्बीमध्ये केली जाते. तीळ पीक हे प्राचीन काळापासून घेण्यात येत असल्याने महत्त्वाचे तेल बिया पीक आहे तिळामध्ये साधारणपणे 50 टक्के तेल आणि 25 टक्के प्रथिने असतात. तिळाच्या भेंडीमध्ये प्रथिने कॅल्शियम व फॉस्फरस हे खनिज पदार्थ असतात.

महाराष्ट्रामध्ये तिळाची लागवड साधारणता 27 ते 28 हजार हेक्टरवर केली जाते. तिळाची उत्पादकता कमी असल्याने तिळाला नेहमीच जास्त भाव बघायला मिळतो.

तीळ पिकाची कमी लागवड असण्याचे कारण म्हणजे, हे पीक प्रामुख्याने जिरायती खालील वरकस जमिनीत किंवा कसदार जमिनीत येण्यासारखे आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा कमी वापर, जाती योग्य बियाणे न मिळणे आणि त्यामुळे कमी पीक म्हणूनच मोजकेच शेतकरी हे पीक घेतात. सुधारित तंत्रज्ञान वापरून लागवड जर करण्यात अली तर उत्पादन वाढवण्यासाठी मोठा वाव मिळू शकतो. योग्य काळजी आपण घेतली आणि तीळ पीकाचा चांगल्या सुधारित जातीची लागवड केल्यास या पिकापासून भरपूर उत्पन्न मिळते.

कुठले हवामान योग्य :-

तिळ पिकाला मध्यम पावसाची आवश्यक असते, हे पिक जिरायती खाली घेता येते. बियाण्याच्या चांगल्या वाढीसाठी आणि उगम शक्तीसाठी तापमान 15 अंश सेल्सिअस योग्य ठरते. तर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 25 ते 28 अंश सेल्सिअस हे तापमानात मिळाले तर पीक जास्त प्रमाणात येते. फळधारणा होण्याच्या वेळी 26 ते 32 अंश सेल्सिअस तापमान असल्यास झाडांना फळधारणा चांगली होते.

कोणती जमीन लागवडीसाठी योग्य :-

तीळ पिकाची लागवड करत असताना सुपीक आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत घेता येते. मध्यम ते भारी किंवा काळ्या जमिनीमध्ये तिळाचे पीक आपण घेऊ शकतो. हे पीक घेताना चांगली मशागत करणे आवश्यक असते. तिळाचे बियाणे बारीक असते पेरणीनंतर तिळाचे झाड हे कोवळे असते म्हणून शेतीची मशागत करताना नागरटी करून ट्रॅक्टअरच्या साह्याने रोटावेटर किंवा टिलरच्या साहाय्याने 2 ते 3 वाई देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. नंतर जमीन सपाट करून घ्यावी. त्या जमिनीतून पाण्याचा निचरा होणे गरजेचे असते जमिनीची चांगली मशागत केल्यास झाडांची उगम शक्ती ही चांगली राहते.

बियाण्यांची बीज प्रक्रिया :-

जमिनीमधून उद्भवणारे बुरशीसारखे रोग होऊ नये म्हणून बियाण्यांवर बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते. हेक्टरी साधारणतः 2.5 ते 3 किलोग्रॅम प्रति हेक्टरी बियाणे वापरावे बीजप्रक्रिया करताना बाविस्टीन चार ग्रॅम प्रति किलो वापरावे.

पेरणीचा काळ :-

तिळाची लागवड करत असताना आपल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन किंवा मान्सूनचा पहिला पाऊस पडून गेल्यानंतर, दुसऱ्या पावसाळ्यात म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करणे गरजेचे असते. पेरणी करताना बियांमध्ये बारीक वाळू किंवा बारीक मिश्रखत वापरून बियांची पेरणी करावी. लागवड करताना बियाणे जास्त खोलवर टाकू नये. तीळ पिकाची लागवड करत असताना

तीळ पीक हे एकदम बारीक आकाराचे असल्याने पेरणीच्या वेळी बियांची संख्या जास्त प्रमाणात सुटते त्यामुळे झाडांची संख्या जास्त होते. असे झाल्यास झाडे आकाराने बारीक होतात आणि त्यांना फळधारणा होत नाही. पेरणीनंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली विरळनि केल्यास पीक चांगले होते. 15 ते 22 दिवसांनी दुसरी विरळनि केल्यानंतर पिकाचे योग्य वाढ होते. यासाठी पिकाचे विरळनि करणे गरजेचे असते.

तिळाचे पीक जास्त प्रमाणात घ्यायचे असल्यास खताचे नियोजन करणे गरजेचे असते, जमिनीत शेणखत टाकणे गरजेचे असते आणि नत्र, पालाश, युरिया या गोष्टी देणे गरजेचे असते, त्यासोबतच पिकाला गरजेनुसार फवारणी करावी. अशा प्रकारे सर्व गोष्टींचे योग्य नियोजन केल्यास पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पन्नसुद्धा भरघोस येते. अशा या तिळाच्या तेलाची मोठी मागणी बाजारात बघायला मिळते म्हणूनच, पिकाची योग्य काळजी आणि अचूक नियोजनानंतर ही तिळाची लागवड आपल्याला नफा मिळवून देईल यात शंकाच नाही.

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *