सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वर्ष २०२२- २३ राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढविण्यासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी तसेच मूल्य साखळी विकासासाठी ३ वर्षात एक १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
हे ही वाचा (Read This ) या ९० दिवसीय पिकाची लागवड करून मिळवा भरगोस उत्पन्न, आंतरपिकासाठी उत्तम पर्याय
सोयाबीन आणि कापसाची लागवड विदर्भ तसेच मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणून कापूस आणि सोयाबीन पिकांची केंद्र अशी ओळख आहे.या मागील मूळ उद्देश शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. मूल्य साखळी विकासासाठी ३ वर्षात एक १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली.
हे ही वाचा (Read This ) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग
.
भुविकास बँकांचे ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांकडे असणारे ९५४ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसेच भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी घोषित केले.
पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामध्ये जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करेल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा (Read This ) शेतीतील एक वेगळा प्रयोग, या पिकाची लागवड करून घ्या चांगले उत्पन्न