सोन्याचा भावात शेणखत मिळणार , शेतकऱ्यांना शेती करावी की नाही पडला असा प्रश्न.

Shares

आता रासायनिक बरोबर शेणखतासाठी देखील मोजावे लागणार जास्त पैसे / सोन्याचा भावात शेणखत मिळणार , शेतकऱ्यांना शेती करावी की नाही पडला असा प्रश्न.

शेतकरी अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर करत असतो. परंतु आता शेतकरी नैसर्गिक खतांचा वापर जास्त प्रमाणात करू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात जैविक खतांचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे शेणखताची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या २ दिवसापूर्वीच रासायनिक खतांची किंमत वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. आता रासायनिक खतांबरोबर शेणखताच्या किमतीत देखील वाढ झाली आहे.
जमिनीतील पोषक घटकांची पूर्तता व्हावी यासाठी शेतकरी शेणखताचा वापर करत आहे.नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच योग्य वेळ आहे असे आपल्या पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी एका भाषणात सांगितले होते.शेतकरी अधिक उत्पादन व्हावे यासाठी रासायनिक खतांचा वापरा बरोबर विविध प्रयोग देखील करत असतो. उत्पादन वाढिच्या नादात शेतजमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतजमिनीचे आरोग्य धोक्यात म्हणजेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे असे म्हणता येईल. यामुळे नैसर्गिक शेती करण्याची योग्य वेळ हीच आहे. त्यामळे अनेक शेतकऱ्यांनी नैसर्गिक खतांचा वापर करून शेती करण्याचे ठरवले होते. मात्र आता तर शेणखताच्या वाढलेल्या किमतीमुळे नैसर्गिक खतांचा वापर काय शेतीच करावी की नाही असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे.

एक ट्रॉली शेणखताची किंमत किती?
चांगले उत्पादन मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक खतांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. शेणखताची वाढती मागणी पाहता शेणखताच्या एका ट्रॉली ची किंमत ही थेट ६ हजार रुपये झाली आहे. शेतात ती शेणखताची ट्रॉली नेण्यासाठी साधारणतः हजार रुपये खर्च येतो. सर्व गोष्टी पाहता शेणखताच्या एका ट्रॉलीचा खर्च ७ हजार रुपये पर्यंत होतो.

कसा वाचवावा हा हजारों रुपयांचा खर्च ?
तुम्ही जर सेंद्रिय पद्धतीने शेती करत असाल आणि शेणखताच्या या वाढत्या किमतीमुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडलाय असे वाटत असेल तर चिंता करण्याची काही ही गरज नाही. तुम्ही अगदी मोफत सेंद्रिय खताचा वापर करू शकता. तुमच्या शेतात काढणी केल्यानंतर पिकाचे कडबा, पाचट असे अवशेष राहत असेल. ते अवशेष जाळून न टाकता त्यास शेतात दफन करावेत. यापासून सेंद्रिय खत तयार होते.

जमिनीचे स्वास्थ चांगले राहावे आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *