आता संपूर्ण कृषी सेवा होणार ऑनलाईन !

Shares

सध्याचा काळ बघता शाळेपासून कार्यालयापर्यंत सर्व कामे ही ऑनलाईन केली जात आहेत. कृषी सेवा केंद्रामध्ये अत्याधुनिकता वाढावी यासाठी कृषी विभाग अनेक प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी एक प्रयोग केला होता तो म्हणजे शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यास लावला होता. या प्रयोगामध्ये कृषी सेवा विभागाला उत्तम असे यश मिळाले आहे. त्यामुळे आता कृषी सेवा परवान्यासाठी च्या अर्जांपासून ते परवाना मंजुरी पर्यंतचे सर्व अर्ज ऑनलाईन राहणार आहे. सर्वांना परवान्यांची नोंदणी नव्याने ऑनलाईन करावी लागणार आहे अन्यथा आधीचे विक्री परवाने रद्द करण्यात येणार आहे. ई परवाना या संकेतस्थळावर सध्या कोणतीही कामे होणार नाही. त्यामुळे आता ३१ डिसेंबर पूर्वीच कृषी सेवा चालकास सर्व कामे ‘आपले सरकार ‘ या संकेतस्थळावर करावी लागणार आहे.
कृषी सेवा केंद्र चालकाने परवान्याची मागणी केली असता तालुका स्तरावरील अधिकारी पैशांची लूट करत होते. ही प्रथा बंद करण्यात आली असून कृषी सेवा केंद्र चालकांना ऑनलाईन प्रणालीद्वारे परवाना सुधारित करण्यात येणार आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *