राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार नव्हे शेतकरी राजाचा आत्म सन्मान होय

Shares

आदरणीय मान्यवर,

भारता सारख्या कृषी प्रधान देशाचे दुर्दैव असे की, या देशातील नायक शेतकरी हा कायम दुर्लक्षित राहिला. संपूर्ण जगाचा पोशिंदा अवहेलना,गरिबी,कुचेष्टेचा कायमचा बळी पडला,पांढरपेक्षा समाजात शेतकरी म्हणजे,समाजाचे ओझं,असेच काई बांडगूळांना वाटते,संपूर्ण मानवी समाजाच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी कायमचा जुंपलेला सर्जा,बळीराजा,आमचा पालक कौतुकास पात्र ठरतो.त्याच्या कार्याची दखल घेतली पाहिजे,हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने २१ मे शेतकरी,शेतमजूर,शेतीशी निगडित प्रशासकीय अधिकारी,कृषी शास्त्रज्ञ यांचा गौरव करण्याची संकल्पना तेव्हाचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीवजी सातव यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील युवक काँगेसच्या पदाधिकारी यांच्या समोर ठेवली आणि आपापल्या जिल्यात राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण समारंभ आम्हाला आयोजित करण्यास प्रेरित केले.

खरीप हंगामात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर हे सोपे काम मे महिन्यात नक्की करा

येथूनच राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार सुरू झाला. या पुरस्काराची पालखी मी माझ्या खांद्यावर घेतली.माझ्या काँग्रेस पक्षाची सुरवात ब्लॉक अध्यक्ष,तालुका अध्यक्ष व जिल्हाअध्यक्ष असा होता.या चळवळीत अनेक राष्ट्रीय व सामाजिक काम करता आले.समाजासाठी कायम काम करण्याची संधी काँग्रेस पक्षात मिळत गेली.त्यानुसार २१ मे २००७ ला स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त माझ्या जन्मगावी नया अकोला ता.जी.अमरावती येथे शेतकऱ्यांचा सन्मान करून “राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराची” यशस्वी मुहूर्तमेढ रोवल्या गेली.त्यानंतर सालाबादप्रमाणे २००८ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व शहिदांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले यावली शहीद येथे राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार सोहळा पार पडला.

या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या धन्याला संसारात शेत कामात मदत करणारी,संसाराची गाडा योग्य चालवून शेतकऱयाला आजन्म सोबत करणाऱ्या असंख्य स्त्रिया आहेत,त्यांच्या त्यागाला,मेहनतीला सलाम करीत शेतकरी स्त्रियांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हे करत असताना या शेतमाऊलीच्या ऋणातून मुक्त होण्याची भावना मनात सहजपणे निर्माण झाली व स्त्री जातीला सन्मानित करण्याचे सुरवात हा कार्यक्रमात झाली.याचा मला सार्थ अभिमान आहे.या पुरस्काराचा पुढील टप्पा २००९ साली खोलापूर तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथे राजीव सातव यांच्या उपस्थितीत पार पडला.

खरिपात पांढरे सोने बहरणार : कृषी तज्ज्ञांचा अंदाज, कापसाखालील क्षेत्र वाढेल, विक्रमी दर मिळण्याची शक्यता ?

मा.राजीव सातव यांच्या हस्ते काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकरी पुत्रांचा गौरव करण्यात आला.२०१०साली “राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्टान”स्थापन करून कृषिरत्न पुरस्काराचे स्वरूप व्यापक करून अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यातील १४ प्रयोगशील,यशस्वी शेतकऱ्यांना गौरवाणीत केलं.२०११-१२ या वर्षीचा पुरस्कार सोहळा अमरावती येथे पार पडला.यामध्ये शेतकरी वर्गाशी संबंधित कृषी अधिकारी,मंडळ अधिकारी, कृषी तज्ञ,कृषी वैज्ञानिक या व्यक्तीचा सन्मान करण्याची कल्पना समोर आली आणि २०१२ साली शेतकरी मित्र म्हणून २ व्यक्तींना पुरस्कार देऊन ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली.२०१३ साली हा पुरस्कार सोहळा नांदुरा या कोरडवाहू जमीन असलेल्या गावात पार पडला.यातून या गावातील लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले.२०१४ सालीचा हा पुरस्कार सोहळा २०१४ साली अमरावती येथे घेण्यात आला.यामध्ये २००० शेतकरी बंधू,माता व भगिनींच्या उपस्थितीत १४ प्रगतिशील शेतकरी,तिफन चालवणारा प्रख्यात “तिफणकरी”,२ कृषी वैज्ञानिक यांना पुरस्कृत करण्यात आले.

आपल्या तिफन चालवण्याच्या कुशलतेने मोतीदार दाणे काळ्या मातीत पेरतो,सरळ रेषेतील पेरणीने २ शेतकरी बांधवात वाद होण्याचे प्रसंग टळतो, तो उत्कृष्ट तिफणकरी,उत्कृष्ट बैल जोडीचा मालक,२ कृषी शास्त्रज्ञ यांना सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम सर्व शेतकरी बांधवांनी डोक्यावर घेऊन आमच्या कार्याची प्रशंसा केली.अश्या रीतीने ह्या पुरस्काराची वाटचाल २०१५ सालापर्यंत आली,संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण केल्या गेले.शेतकरी वर्गाला आत्मनिर्भर करण्यासाठी,शेती व्यवसायला पूरकजोड धंदा करण्यासाठी शेतकरी बचत गटाची निवड केली,यातून त्यांना लघुउद्योग करण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळेस ३ ते ४ हजारांची शेतकऱ्यांची उपस्थिती आमचे मनोबल वाढवण्यास कारणीभूत ठरली.२०१६ हे वर्ष “राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराचे”१० वे वर्ष होते.सन २०१७,सन २०१८,सन २०१९ या वर्षात विदर्भस्तरीय आयोजन करून गावगाड्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांची राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कारासाठी केलेली निवड आमच्यासाठी मानाचा तुरा रोवून गेली

पीएम किसान: तुमच्या स्टेटसवर लिहिले आहे का FTO is Generated, असेल तरच पुढचा हप्ता मिळणार

त्याचे कारणच असे की,राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कारासाठी निवड केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे मानाचे पुरस्कार मिळाले.सन २०२० व २०२१ हे वर्ष कोव्हीड-१९ मूळे प्रभावित झाले,कार्यक्रमाचा गाजावाजा न करता सन २०२० व २१ ला पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेताचा बांधावर जाऊन सन्मानित करण्यात आले.मागील १६ वर्षाचा आढावा या ठिकाणी घेतलाच आहे.आज विदर्भ, मराठवाडा दुष्काळी परिस्थितीचे चटके सहन करतोय.अश्या या भीषण परिस्थितीत शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.नेहमीच विपरीत परिस्थिती कमी भांडवल, कमी खर्चाची शेती करून शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या देशाच्या उत्पादनात वाढ करतोय.देशातील जनतेची अन्नधान्याची गरज पूर्ण करतोय आणि देशाच्या प्रगतीसाठी कायम झटतो.त्याला प्रोत्साहन आणि त्याच्या कर्तुत्वाला साष्टांग दंडवत म्हणजे “राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार”होय.

कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर नेहमी मागणी असलेल्या काळ्या मिरीची लागवड करा.

स्व.राजीव गांधी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी माझ्या सारखा कार्यकर्ता कायम धडपडत असतो.राजीवजींनी खऱ्या अर्थाने या देशात विज्ञान-तंत्रज्ञानाची बीजे रुजवली.शेतीला आधुनिक चेहरा दिल्याशिवाय पर्याय नाही,शिवाय शेतीला विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड दिली तरच शेतकरी आणि शेती व्यवसाय समृद्ध होईल अशी धारणा स्व.राजीव गांधीजी यांची होती.या विचारधारेला अनुसरून आमची घोडदौड सुरू आहे.अशा उपक्रमातून शेती संदर्भात विविध विषयावर चर्चा होते,आश्वासक तोडगा निघतो.शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक जण समोर येतात.हीच या पुरस्काराची यशस्वीता ठरते.मागील १६ वर्षाच्या इतिहासात मा.अशोकराव चव्हाण,मा.माणिकराव ठाकरे, मा.राजीवजी सातव,मा.राधाकृष्ण विखे पाटील, मा.विश्वजित कदम,मा.सत्यजित तांबे,मा.शिवराज मोरे,सुप्रसिद्ध वर्हाड कवी,तिफणकार प्रा.विठ्ठलराव वाघ या महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. या पुरस्काराचा सोहळा २१ मे २०२२ यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान मंत्रालय समोर मुंबई या ठिकाणी दुपारी १ वाजता राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा वितरीत करण्यात येणार आहे..

ही वाचा (Read This) आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी कांद्याची एक नवीन जात केली विकसित, हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल आणि लवकर खराब न होणारी !

सदर शेतकऱ्यांच्या कौतुक सोहळ्यास ,मा.श्री नानाभाऊ पटोले,मा.श्री.बाळासाहेब थोरात,मा.श्री.अशोकराव चव्हाण, मा.श्री.माणिकराव ठाकरे,मा.श्री.विश्वजित कदम तसेच मा.श्री.विजय भटकर,मा.श्री.प्रा.विठ्ठल वाघ,मा.श्री.डॉ.सुरेश हावरे, आदी मंडळींना विशेष निमंत्रित केले आहे..यावर्षी या सन्मानाचे आयोजन राज्यस्तरीय करीत असतांना अश्या समारंभातुन माझ्या शेतकरी बांधवाना जगण्याचे बळ मिळावे हीच या मागची माफक अपेक्षा, या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह,राजीव गांधी यांची प्रतिमा,प्रशस्तीपत्र,शाल,श्रीफळ असे आहे.या पुरस्काराचा आयोजक या नात्याने स्वतः एक शेतकरी, काँग्रेस चळवळीतील सच्चा कार्यकर्ता म्हणून फकिराचे जिणे भोगत असलेल्या, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आपल्या जीवनाचा प्रवास अखंडीत असलेल्या बळीराजा मध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा होय.

शेती,शेतकरी वर्गाविषयी असंवेदनशील असलेल्या सरकारवर अवलंबून न राहता शेतकऱ्याला आत्मनिर्भर करण्यासाठी,शेतकऱ्याच्या सन्मानासाठी,न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या लढ्यात सहभागी व्हावे व अश्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट पाहून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविता, पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करून गेल्या १६ वर्षापासून सातत्याने होत असलेल्या गौरव सोहळ्यास खंड पडू नये यासाठी सुद्धा आयोजन समिती प्रयत्नशील आहे. या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ लावणारे खासदार स्व.राजीव सातव यांना प्रत्येक पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या वतीने अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करणार आहे* आपण यावर्षी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना कौतुकाची थाप देऊन शुभेच्छा प्रदान कराव्या ही आग्रहाची विनंतीसह

“राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार-२०२२” या सोहळ्याचे आग्रही निमंत्रण-धन्यवाद       

!!जय किसान!!

शेती धनवान तर शेतकरी धनवान

     आपलाच   

  प्रकाश साबळे

अध्यक्ष राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती

९८२३६६१४४८

राणा दाम्पत्यानां दिलासा ; तब्बल १२ दिवसानंतर जामीन मंजूर

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *