राजमा लागवड पद्धत

Shares

उत्तर भारतात लोकप्रिय असणारा राजमा म्हणजेच घेवडा बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तसे पहिले तर शेंगवर्गीय पिकात घेवडा कमी दिवसात जास्त उत्पादन देणारे पीक आहे. महाराष्ट्रामध्ये सातारा , पुणे , नाशिक, सोलापूर , अहमदनगर येथे मोठ्या संख्येने घेवड्याचे पीक घेतले जाते.अंदाजे ३१०५० हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात घेवडा लागवडी खाली आहे.घेवडयाच्या कोवळ्या शेंगाची भाजी आणि सुकलेल्या दाण्यांची उसळ आपण बनवून खातो. या शेंगांमध्ये लोह , खनिजे आणि जीवनसत्व अ , ब मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

जमीन आणि हवामान –
१. पाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत या झाडांची वाढ चांगली होते. .
२. जमिनीचा सामू ५.५ ते ६ च्या दरम्यान असावा.
३. अतिथंड व अतिउष्ण हवामान घेवडा पिकास मानवात नाही.
४. थंड व पावसाळी हंगाम या पिकास अनुकूल आहे.
५. १५ ते ४० अंश सेल्सिअस तापमान या पिकास उत्तम ठरते.

पूर्व मशागत –
१. कुळव्याच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करून घ्या.
२. जमीन आडवी व उभी नांगरट करून घ्यावी.
३. प्रति हेक्टरी ४० ते ४५ बैलगाड्या शेणखत मातीत मिसळावेत.

लागवड हंगाम –
१. तिन्ही हंगामात महाराष्ट्रामध्ये हे पीक घेतले जाऊ शकते.
२. खरीप हंगामासाठी जून व जुलै महिना उत्तम ठरतो .
३. रब्बी हंगामासाठी सप्टेंबर व ओक्टोम्बर महिना उत्तम ठरतो.
४. उन्हाळी हंगामासाठी जानेवारी व फेब्रुवारी महिना उत्तम ठरतो

वाण –
घेवड्याच्या पुढील जाती लागवडीयोग्य आहेत.
१. अर्का कोमल
२. पुसा पार्वती
३. कटेंडर
४. जंपा ५
५. पंत अनुपमा

बियाणे –
१. प्रति हेक्टरी ४० किलो बियाणे लागतात.
२. जर तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करत असाल तर प्रति हेक्टर २५ ते ३० किलो बीयाने लागतात.

लागवड –
१. खरीप हंगामात पाऊस पडून गेल्यावर पाभरीने किंवा तिफणीने पेरणी करावी.
२. पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर ४५ सेमी तर दोन झाडातील अंतर ३० सेमी पर्यंत ठेवावे.
३. २ ते ३ सेमी खोलीवर बिया टोकन पद्धतीने पेराव्यात.
४. उन्हाळी हंगामात बियांची पेरणी ६० ते ७० सेमी अंतरावर सरी वरंब्यावर करावीत.

खत व पाणी व्यवस्थापन –
१. घेवडा पिक जमिनीत असणारे स्फुरद , पालाश , नत्र असे मुख्य अन्नद्रवे शोषून घेतात.
२. घेवडा पिकास प्रति हेक्टरी ४० टन शेणखत , ५० ते ११० किलो पालाश , ५० ते ५४ किलो नत्र , ५० ते १०० किलो स्फुरद द्यावे लागते.
३. घेवड्याच्या पिकांना फुले येण्याआधी पाणी दिले पाहिजे.
४. पावसाळ्यात जमिनीतील पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घेतली पाहिजे.
५. खरीप हंगामात पिकास पाणी देण्याची गरज भासत नाही परंतु पाऊस नसल्यास गरजेनुसार पाणी दिले गेले पाहिजे.
६. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी दिले पाहिजे.

उत्पादन –
याचे उत्पादन २७ क्विंटल पर्यंत घेता येते .

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *