शेतकरी या व्यवसायातून वर्षभर कमवू शकतात, सरकारही करणार मदत

Shares

शासन शेतकऱ्यांना शेती ( Agriculture ) बरोबर पूरक असा व्यवसाय करता यावा यासाठी अनेक विविध योजना राबवत असते. शेतकरी (Farmer) गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा अश्या अनेक अन्नधान्यांची लागवड करत असतो मात्र कित्येकदा याचा काहीही परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होत नाही. याचे कारण म्हणजे उत्पादन मुबलक प्रमाणात होत नाही तर कधी उत्पादन होते मात्र त्यास दर मिळत नाही. अश्या परिस्थितीत शेतकरी कर्ज ( Farmer Loan ) काढतो आणि हे कर्ज फेडण्यासाठी त्याला इतर व्यवसाय ( Business ) करावा लागतो. तर काही शेतकरी अधिक उत्पन्न मिळावे यासाठी शेतीबरोबर इतर व्यवसाय करत असतो.
यासाठी शासनाने ( Government) शेतकऱ्यांसाठी शेती बरोबर इतर व्यवसायासाठी अनेक योजना ( Scheme) , उपक्रम राबवले आहे. अश्याच एका योजनेची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ( Pradhan Mantri Matsya Sampada Yojna ).

काय आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना?
शेतकऱ्यांसाठी खास प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तलाव, फिडींग मशीन, क्वालिटी टेस्टिंग लॅब ची सुविधा पुरवली जाणार असून याचबरोबर त्यांना मत्स्यपालनाची संपूर्ण माहिती पुरवण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना रेस्क्यूलेटरी अक्वाकल्चर, एक्वापोनिक्स,( Aquaponics) फिश फीड मशीन, एयरकंडीशन गाड़ी आणि फिश कीपिंग दिले जाते.

हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांना मिळणार १५ लाख, या योजनेचा लाभ घ्या !

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे फायदे
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मत्स्यपालन, रंगीबिरंगी मत्स्यपालन , ब्रॅंडिंग यांसारख्या अनेक गोष्टींसाठी याचा फायदा होईल. शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही योजना सुरु केली आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत ?
शेतकऱ्यांबरोबर या योजनेचा लाभ फिश सेलर्स, सेल्फ हेल्प ग्रुप, फिश ट्रेडर्स देखील घेऊ शकतात.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *