PM किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर असा मिळवा 31 मार्चपर्यंत.

Shares

शेतकऱ्यांच्या खात्यावर पिएम किसान योजनेचा हफ्ता जमा होऊन आता 10 दिवस झाले आहेत. पीएम किसान सन्मान निधी(PM Kisan Sanman Nidhi Yojna) चा फायदा आतापर्यंत देशातील 10 कोटी 50 लाख 72 हजार 528 शेतकऱ्यांनी घेतला असून इतक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 2 हजार रुपये प्रति प्रमाणे रूपये जमा झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही या योजनेसाठी अर्ज केलेला नाही. या योजनेचा लाभ अजून ही 65 लाखांपेक्षा जास्त शेतकरी घेऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांना 10 वा हफ्ता मिळाला नाही ते शेतकरी अर्ज करून 31 मार्च पर्यंत हफ्ता मिळवू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नसून शेतकरी (Farmers) स्वतः अर्ज (Application) करू शकतो.

कसा करावा अर्ज ?
अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. तुम्ही नोंदणी कराल तेव्हा तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड देखील मिळण्याची शक्यता आहे. किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) च्या अंतर्गत तुम्हाला 3 लाखाचे कर्ज 4% व्याजदराने मिळते. पीएम किसान योजनेसाठी अर्ज करतांना तुम्हाला संकेतस्थळावर गेल्यानंतर Farmers Corner या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. मग तुम्हाला भाषा निवडून तिथे विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरून अपलोड पर्यायावर क्लिक करायचे आहे.

हे ही वाचा (Read This) या योजनेचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घेतला सर्वात जास्त लाभ, शेवटची तारीख १५ फेब्रुवारी

माहिती भरणे आवश्यक?
अर्ज करतांना तुम्हाला आधार कार्ड क्रमांक, मोबाइल नंबर, खाते क्रमांक, बँकेचे नाव, जन्मतारीख, जमीन रेकॉर्ड, रेशन कार्ड क्रमांक, पत्ता आदी सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ

https://pmkisan.gov.in/

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *