ओक्टोम्बर महिन्यात घेतले जाणारे हिवाळी पीक

Shares

शेतकऱ्यांना एकवर्णी पीक घेऊन चालत नाही तर त्यांना बहुपीक पद्धतीचा अवलंब करावाच लागतो. ओक्टोम्बर महिन्यात भाजीपाल्याचे पीक घेणे सोयीस्कर ठरते. ओक्टोम्बर महिन्यात जास्त थंडी नसते आणि गरमपणा देखील नसतो. हा महिना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असतो. या महिन्यात भाजीपाला लवकर सडत नाही. या महिन्यात ब्रॉक्रोली , मुळा , टोमॅटो , पालक , फुलकोबी आदींची लागवड करता येते. आज आपण ओक्टोम्बर महिन्यात लागवड केल्या जाणाऱ्या भाजीपाल्यांचे प्रकार आणि जाती यांची माहिती घेणार आहोत.

मुळाच्या सुधारित जाती –
१. पुसा चेतकी – मुळाच्या या जातीची लागवड संपूर्ण भारतात करता येते.ही जात खूपच पांढरीशुभ्र आणि मऊ असते.ही जाती ४०-५० दिवसात तयार होते.मुळाच्या या जातीपासून शेतकरी प्रति एकर १०० क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतो.
२. पुसा हिमानी – या जातीचा मुळा लांब ,पांढरा आणि थोडा तिखट असतो. मुळ्याची ही वाण ५०-६० दिवसात तयार होते.शेतकरी या जातीतून प्रति एकर १२८ ते १४० क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतो.
३. जपानी सफेद – या मुळांचे वाण ४५ ते ५५ दिवसात तयार होते. या जातीतून शेतकरी प्रति एकर १०० ते २०० क्विंटल उत्पादन घेऊ शकतो.

ब्रोकोली सुधारित जाती –
१. केटीएस-१ – ब्रोकोलीच्या या जातीचे देठ अतिशय कोमल , नाजूक असतात.यांचे सरासरी वजन २०० ते ३०० ग्रॅम पर्यंत असते. हे पीक लागवडीनंतर ८० ते ९० दिवसांनी तयार होते.
२. पालक समृद्धी – ब्रोकोलीच्या या जातीचे देठ लांब आणि कोमल असतात. यांचे सरासरी वजन २०० ते ३०० ग्रॅम पर्यंत असते. हे पीक लागवडी नंतर ८५ ते ९० दिवसांनी तयार होते.
३. ब्रोकोली संकरित १ -ब्रोकोलीच्या या जातीचे देठ अतिशय कोमल असतात. यांचे सरासरी वजन ६०० ते ८०० ग्रॅम असते. हे पीक लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी तयार होते.

पालकच्या सुधारित जाती –
१. ऑल ग्रीन – पालकाच्या या जातीची पाने हिरवी आणि मऊ असतात. ही वाण १५ ते २० दिवसात परिपक्व होते.
२. पुसा हरित – पालकाची ही जात गडद हिरव्या रंगाची असते. याची पाने आकाराने मोठी असतात. या जातीची लागवड डोंगराळ भागात करता येते. या जातीचे पीक सर्व प्रकारच्या हवामानात आणि जमिनीत घेता येते.

फ्लॉवरच्या सुधारित जाती –
१. फ्लॉवरच्या सर्वच जातींसाठी ओक्टोम्बर महिना उत्तम आहे.
२. जपानी , पुसा दिवाळी , पुसा कटकी, पंत शुभ्र आदी जातींची लागवड करून शेतकरी उत्तम नफा मिळवू शकतो.

अश्याप्रकारे जर तुम्ही बहुपीक पद्धतीचा वापर करत असाल तर ओक्टोम्बर महिन्यात ह्या पालेभाज्यांचे पीक घेतले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *