ओसाड शेतजमीन अशी बनवा सुपीक !

Shares

चांगले तसेच अधिक उत्पादन मिळण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत असतो. चांगल्या उत्पादनासाठी विविध प्रयोग करता करता आपले जमिनीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. जमिनीची सुपीकता टिकून रहावी, मातीची रचना सुधारावी , खत क्षमता वाढावी यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. ह्यूमिक आम्ल हे जमिनीच्या सुपीकतेवर अत्यंत उपयोगी ठरते. ह्यूमिक आम्लामुळे पिकांवर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही. ह्यूमिक आम्ल माती, लिग्नाइट, पीट समुहासारखा सेंद्रिय पदार्थांचा एक घटक असल्यामुळे याचा वापर केल्यास रोपाची वाढ होऊन पिकात चांगली सुधारणा होते. ह्यूमिक आम्लास पोटॅशिअमचा महत्वाचा भाग म्हणता येईल. अश्या मातीसाठी वरदान ठरलेल्या ह्यूमिक आम्लाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

ह्यूमिक आम्ल व त्याने फायदे –
१. ह्यूमिक आम्ल हे अत्यंत उपयुक्त असणारे खनिज आहे. या आम्लाचा वापर करून पडीक जमिनीचीही सुपीकता वाढवता येते.
२. हे आम्ल जमिनीत ओलावा टिकून राहण्याचे काम करते.
३. जमिनीत खत चांगले विरघळून पिकांपर्यंत पोचवण्याचे काम हे आम्ल करते.
४. या आम्लाद्वारे जमिनीत नायट्रोजन, लोह जोडले जाते.
५. यामुळे मूळ, दुय्यम, तृतीयक मुळे तयार होतात.
६. हे आम्ल मातीमधील हवा वाढवते.
७. वनस्पतीमधील प्रकाशसंश्लेषण वाढवण्याचे काम हे आम्ल करते.
८. या आम्लामुळे वनस्पतीचे पोषक तत्त्वाचे शोषण वाढते.
९. वनस्पतीच्या आत जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

ह्यूमिक आम्ल तयार करण्याची पद्धत –
१. ह्यूमिक आम्ल तयार करण्यासाठी साधारणतः २ वर्ष जुने शेणाच्या गौऱ्या , ५० लिटर क्षमता असलेले पाण्याचे ड्रम असणे आवश्यक आहे.
२. सर्वप्रथम शेणाच्या गौऱ्यांनी ड्रम भरा.
३. त्यानंतर ३० लिटर पाण्याचे ड्रम भरून ७ दिवसापर्यंत ते झाकून ठेवावेत.
४. ७ दिवसानंतर ड्रममधील पाणी गडद लाल , तपकिरी रंगाचे झाले असल्यात त्या ड्रममधील शेण काढून कापडाने पाणी गाळून घ्यावे.
५. गाळलेले पाणी ह्यूमिक आम्ल म्हणून वापरता येते.

ह्यूमिक आम्ल वापरण्याची पद्धत –
१. तयार केलेले पाणी जमिनीत मिसळावेत.
२. वनस्पती लागवड करण्यापूर्वी मुळे पाण्यात बुडवावी.
३. रासायनिक खतामध्ये मिसळून देखील फवारणी करता येते.
४. ठिबक सिंचनाद्वारे देखील याचा वापर करता येतो.
५. वनस्पती फुलण्यापूर्वी सकाळी किंवा संध्याकळी मिली १ लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी.

जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासाठी तसेच उत्तम उत्पादनासाठी ह्यूमिक आम्लाचा वापर करणे फायदेशीर ठरते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *