खरबूज व टरबूज पिकावरील कीड , रोग नियंत्रण

Shares

शेतकरी फळपिकाच्या लागवडीकडे जास्त वळत चालला आहे. त्यात खरबूज व टरबूज लागवड केली जात आहे. या फळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी यांची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण आज टरबूज व खरबूज वरील रोग व कीड नियोजन कसे करावेत याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

खरबूज व टरबूज वरील रोग नियंत्रण –
भुरी – १. भुरी रोग सर्वप्रथम पानांवर दिसून येतो.
२. पानांच्या खालच्या बाजूस बुरशी येते.
३. पाने कालांतराने पिवळी पडून गळतात.
उपाय – १. ९० लिटर पाण्यात डिनोकॅप १० ग्रॅम मिसळून त्याची फवारणी करावीत.
२. दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा याची फवारणी करावीत.

मर – १. मर हा रोग बुरशीमुळे उध्दभवतो.
२. पीक फुलावर असतांना या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
३. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फुल गळती होते.
उपाय – १. जमिनीतील बुरशीमुळे हा रोग होतो.
२. पेरणी करण्यापूर्वी १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम द्यावेत.

केवडा – १. पानांवर पिवळ्या , भुरकट रंगाचे ठिपके दिसतात.
२. पानांच्या देठ व फांद्यांवर याचा परिणाम दिसून येतो.
उपाय – डायथेन झेड ७८ ची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येतो.

टरबूज व खरबूज पिकावरील कीड नियंत्रण –
मावा – १. पिवळ्या व हिरव्या रंगाचे किडे पानातील पूर्ण रस शोषून घेतात.
२. पाने पिवळी पडतात.
उपाय – मावा किडीचे लक्षणे दिसताच रोगर हे औषध ०.१ % पिकांवर फवारावेत.

फळमाशी – १. या माशीमुळे फळाचे मोठ्या संख्येने नुकसान होते.
२. फळमाशी फळाच्या सालीत तिचे अंडे घालते.
३. अळी फळातील गर खाऊन टाकते.
उपाय- १. कीड लागलेली , खाली खराब होऊन गळून पडलेली फळे नष्ट करून टाकावीत.
२. मेन्लोथिऑन ची १ % फवारणी पिकावर व जमिनीवर करावीत.

अश्याप्रकारे कोणत्याही रोगाचे व किडीचे लक्षणे दिसताच त्वरित त्यावर उपाययोजना करावी. जेणेकरून फळाचे , पिकाचे नुकसान होणार नाही.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *