कारले पिकासाठी अनुकूल वातावरण

Shares

आयुर्वेदात कारल्यास बरेच महत्व आहे. कारल्यामध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. कारले अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. कारले लागवड करतांना खते , पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे. या पिकाची लागवड अनुकूल हवामानात केली गेली पाहिजे अन्यथा पिकाची वाढ खुंटते व उत्पादनात घट होते. जाणून घेऊयात कारले पिकाची लागवड करतांना कश्याप्रकारे काळजी घ्यावी.

कशी घ्यावी कारले पिकाची काळजी –
१. कारले पिकास उष्ण व दमट हवामान मानवते.
२. थंड वातावरण असेल तर त्याचा कारल्याच्या वेलीवर दुष्परिणाम होतो.
३. भुसभुशीत उत्तम निचरा करणारी भारी ते मध्यम जमीन या पिकासाठी निवडावीत.
४. चोपण जमीन या पिकासाठी निवडू नये.
५. लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरून गवत व तणाचे तुकडे वेचून शेत स्वछ करून घ्यावे.
६. जमिनीत प्रति हेक्टरी प्रमाणे १०० ते १५० क्विंटल शेणखत किंवा कंपोस्टखत मिसळावेत.
७. कारल्याच्या बियांची टोकन ओलसर जमिनीतच करावीत.
८. पिकाची उगवण होई पर्यंत पाणी गरजेनुसार बेताने द्यावे.
९. कारल्याचे उन्हाळी पीक घायचे असेल तर जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात या पिकाची लागवड करावी.
१०. उशिरा उन्हाळी पीक घायचे असेल तर मार्च महिन्यापर्यंत हे पीक घेता येते.
११. खरीपात या पिकाची लागवड जून- जुलै महिन्यात करावी.
१२. उन्हाळी व पावसाळी हंगामात कारल्याचे पीक घेणे सर्वोत्तम ठरते.

कारले पिकाची लागवड योग्य हंगामात केल्यास त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *