कधीही दर कमी न होणारी करडई

Shares

करडई हे एक तेलबिया पीक आहे. करडईचा वापर फक्त तेल काढण्यासाठी आणि कोवळ्या पानांचा वापर हा पालेभाजी म्हणून करतात.करडईचे तेल आरोग्यदायी असते. त्याचे क्षेत्रही मर्यादित असते आणि मागणी जास्त असल्यामुळे भाव कमी होणार नाहीत. त्यात वाढ होईल किंवा दर सध्याच्या ठिकाणी स्थिर राहतील. ज्वारी पिकापेक्षा करडई पिकासाठी कमी मजूर लागतात. आपण अजून जाणून घेऊयात करडई बद्दल

करडईचे उपयोग –
१. खोडामध्ये लिओसिलीसिकचे प्रमाण जास्त असते म्हणून पार्टीकल बोर्ड पेपरसाठी लगदा तयार करण्यासाठी वापरतात.
२. एकत्रित काढणी व मळणी यंत्राद्वारे काढणी केली असता झाडाच्या फांद्या, खोडाचे तुकडे, पाने इत्यादी शेतात विखुरले जातात.
३. कुजल्यानंतर त्यांचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो.
४. पशुखाद्य म्हणून वापरले जाते त्यात २० टक्के प्रथिने असतात.
५. हर्बल औषधे आणि औषधे तयार करण्यासाठी कोवळ्या पाकळ्यांचा वापर केल्या जातो.
६. करडईचे तेल पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडना समृद्ध असते.
७. त्यात लिनोईक अॅसिडचे प्रमाण ७० टक्केपर्यंत आहेत.
८. करडईच्या तेलाची कोलेस्ट्रॉल कमी करण्याची फार मोठी भूमिका आहे आणि हे कोरडे तेल आहे. ९. त्याचबरोबर मधुमेह, हृदयविकार, स्पॉन्डॅलायसिस,
उद्यरक्तदाब, मासिक पाळीतील इत्यादी रोग कमी होतात.
१०. हृदयरोग्यासाठी देखील करडईच्या तेलाची शिफारस केली जाते.
११. हे तेल संधीवातावर उपाय म्हणून ओळखले गेले आहे.

जमीन आणि हवामान –
१. करडईच्या पिकास मध्यम ते भारी (खोल) जमीन वापरावी.
२. ४५ सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी.
३. दुष्काळ प्रतिरोधक पीक असल्याने सर्व प्रकारच्या मातीत याची लागवड केली जाते.
४. पाणी साठवून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो.
५. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येवू शकते.बियाणे उगवण करण्यासाठी मातीचे इस्टमान तापमान १५ ते १६ डिग्री सेल्सिअस इतके हवे.
६. करी हे पिक एक दिवस तटस्थ पीक आहे. हे पीक दुष्काळ प्रतिरोध आणि पाणी असल्यास संवेदनशील आहे. ५०० ते ६०० मि. मी. पावसावर ते चांगले येते.

जाती –
१. मंजिरा,
२. स्थारमुथ्यलु ( एपि आर आर) परभणी कुसुम, ३. फुले कुसुम ,ए-१( राष्ट्रीय तपासणी) संकरित जाती –
१. डी एसएच -१२९,
२. नारी-15, नारी- 38,
३. गिरणा,
४. भीमा,
५. शारदा,
६. श्वेता.

बियाणे –
१. पेरणीसाठी करडईचे १o किलो बी प्रती हेक्टरी वापरावे.
२. पेरणीपूर्वी बियाण्यास २ ग्रॅम बाविस्टीन प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

पेरणी –
१. करडईची पिकाची पेरणी योग्यवेळी करणे फार महत्वाचे ठरते.
२. पेरणी लवकर म्हणजे सप्टेंबर पहिला पंधरवडा केल्यास करडईच्या पिकाच्या पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो आणि मोठे नुकसान होते.
३. त्यामुळे उत्पादनात घट येते.
४. तसेच उशिरा पेरणी केल्यास म्हणजे ऑक्टोबर दुसरा आठवड्यानंतर पीक वाढीची अवस्था थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घट येते. हे नुकसान होऊ नये म्हणून पिकाची पेरणी योग्यवेळेत करणे फायद्याचे ठरते.
५. करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुस-या पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत योग्य ठरते. ६. बागाईत करडईची पेरणी ऑक्टोंबर अखेरपर्यंत करावी.

पाणी व्यवस्थापन –
१. करडई पिकासाठी पाण्याची आवश्यकता २५० ते ३०० मि. मी. इतकी आहे.
२. करडई हे पीक साधारणता पावसाच्या पाण्यावर घेतले जाणारे पीक असून, उर्वरित पाण्याची गरज ही मातीतील आद्रतेमार्फत भागवली जाते.
३. हे पीक दुष्काळ सहन करणारे पीक म्हणून ओळखले जाते.
४. त्याच्या खोल मुळांद्वारे जमिनीच्या खोल थरामधून पाणी शोषून घेण्याची त्याची क्षमता असते.
५. हलक्या जमिनीत दोन ते तीन पाणी सिंचित करावे.
६. दुष्काळी स्थितीत एक जीवन वाचणारे पाणी द्यावेत.
७. गुलाब टप्पा सुरुवातीची वाढीचा अवस्था) हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजे पेरणीनंतर २१ दिवसांनी आणि चार ते सहा पानांची अवस्था असताना सिंचन दिल्यास उत्पादनात ४० ते ६० टक्क्यापर्यंत वाढ निश्चित होऊ शकते.

आंतरमशागत –
१. करडई पीक जमिनीतील ओलाव्यावर वाढत असल्यामुळे पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी दोन जोमदार रोपातील अंतर २० सें.मी. ठेवून विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
२. गरजेनुसार खुरपणी व कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे.
३. तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेरणीपासून तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दातेरी सायकल कोळप्याने कोळपणी करावी.

काढणी –
१. करडई पीक १३० ते १३५ दिवसात काढणीस तयार होते.
२. या पिकाची बोंडे व पाने पिवळी पडल्यानंतर काढणी करावी.
३. कापणी सकाळच्या वेळेस करावी. सकाळी आद्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे काटे टोचत नाहीत.
४. करडई चांगली वाळल्यानंतर बडवणी करावी. एकात्मिक काढणी व मळणी यंत्र पिकाच्या काढणीसाठी उपयुक्त आहे.
५. या यंत्राने कमी वेळेत व कमी खर्चात करडईची काढणी करता येते.
६. या मशीनमधून स्वच्छ धान्य बाहेर येते आणि कोणतीही प्रक्रिया न करता माल विक्रीसाठी नेता येतो.
७. करडई पिकास काटे असल्यामुळे मजूर काढणीसाठी तयार होत नाहीत.
८. त्यासाठी एकत्रित काढणी व मळणीयत्र हे एक वरदान आहे.

उत्पादन –
१. सुधारित तंत्राचा वापर केला असता मध्यम जमिनीत करडई पिकापासून प्रती हेक्टरी १२ ते १४ किंटल तर भारी जमिनीत हेक्टरी १४ ते १६ किंटल उत्पादन सहज मिळते.
२. तसेच बागायती करडईपासून २० ते २२ क्रिटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते.

करडई चे भाव वाढत राहते किंवा आहे तसे स्थिर राहते परंतु कधीही घसरत नाहीत . त्यामुळे हे पीक घेणे अत्यंत फायदेशीर आहे .

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *