खतातील बनावटपणा कसा ओळखावा ?

Shares

जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कमी होऊ न देता जास्तीत जास्त उत्पादन वाढवणे आवश्यक आहे त्यासाठी पिकांना खते देणे काही वेळा गरजेचे असते. पेरणी झाल्यानंतर पिकांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी शेतकरी पिकांना खते देत असतात.जेव्हा खतांचा तुटवडा होतो तेव्हा बाजारात अनेक दुकानदार बनावट खतांची विक्री करण्यास सुरुवात होते. यामुळे शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसानीसह पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होते.

कसे ओळखावे खते बनावट आहेत की नाही –

१. युरिया –

दाणे हे सफेद चमकदार आणि समान आकाराचे असतात. युरियाचे दाणे पाण्यात टाकल्यानंतर तर ते पाण्यात विरघळतात आणि हाताला पाणी थंड लागत असेल तर युरिया असली असल्याचे समजावे. दरम्यान यातील बनावटपणा ओळखायचा असेल तर याचे काही दाणे गरम तव्यावर टाकावे, आच वाढवल्यानंतर हे दाणे नाहिसे झाल्यास हे हा ओरिजनल किंवा उकृष्ट युरिया आहे.

२. पोटॉश –

याची ओळख करायची असेल तर काही दाण्यांवर पाणी टाकल्यानंतर जर दाणे एकमेकांना चिटकत असतील तर तर त्यात काही तरी बनावटपणा असल्याचे समजावे. पाण्यात टाकल्यानंतर पोटॉश विरघळत असते, पाण्याच्या वरच्या भागात लाल रंग दिसत असतो.

३. जिंक सल्फेटचे –

जिंक सल्फेटचे दाणे हे सफेज तसेच भुरक्या रंगाचे बारीक असतात. जिंक सल्फेटमध्ये मॅग्नीशिअम सल्फेटची भेसळ केली जाते. दोन्ही खते एकसारखी दिसत असल्याने दोघांचा फरक करणे सोपे नसते.

४. डीएपी –

असली आहे किंवा नकली हे ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. डिएपीची काही दाने हातात घेऊन तंबाखूला चूना लावून मळतात तशापद्धतीने डीएपीच्या दाणेला चूना लावून मळावे. मळल्यानंतर जर त्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणेही असह्य असेल तर समजावे की, हे असली डीएपी आहे. यात अजून एक सोपी पद्धत आहे, डीएपीचे काही दाणे कमी आचेवर तवा गरम करुन त्यावर टाकावे. जर दाणे फुटले तर समजावे की हे डीएपी असली किंवा खरे आहे.

५. सुपर फास्फेट –

याचे दाणे जाड आणि बदाणी रंगाचे असतात. सुपर फास्फेटचे काही दाणे गरम केल्यानंतर याचे दाणे ही फुलले किंवा फुटले नाही तर समाजावे की, यात कोणताच बनावटपणा नाही.सुपर फास्फेटचे दाणे कठिण असतात, नखांनी हे दाणे तुटत नाहीत.खते जर बनावटी असतील तर त्याचा दुष्परिणाम पिकांवर होतो. त्यामुळे खते तपासून घेणे महत्वाचे आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *