जोडधंद्यांच्या अनुदानाचा लाभ आपण घेतला का ?

Shares

शेतकऱ्यांना शेतीसोबतच अधिकचे उत्पन्न मिळावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जोडधंदे शेतकरी करतात. यामध्ये प्रमुख जोडधंदा म्हणजे शेळी आणि मेंढी पालन. हे उद्योग कमी भांडवलात सुरु करता येत असल्यामुळे कित्येक शेतकरी या स्वरूपाचे जोडधंदे करतात. कमी काळात जास्त उत्पन्न देणाऱ्या या जोडधंद्यांकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा आणि जास्त शेतकऱ्यांनी हा जोडधंदा सुरु करावा यासाठी सरकार अनुदान देत आहे. शेळीपालन आणि मेंढी पालन करण्यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पातळीवर स्टॉक मिशन सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जोडधंद्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

राष्ट्रीय पशुधन मिशन मध्ये अनेक गोष्टी मोडतात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान दिले जाते, ज्यात विविध राज्यसरकारच्या अनुदानाची रक्कम ही एक केंद्रीय योजना बनते आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे अनुदान वाढवण्यासाठी राज्याच्या बाजूने अनुदानाचा काही भाग जोडतात. सदरील योजनेमध्ये लाभार्थ्यांना 10 शेळ्या व बोकड किंवा दहा मेंढ्या दिल्या जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एका युनिटवर फक्त दहा टक्के किंमत द्यावी लागते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘विकास खंड स्तरीय पशू वैद्यकीय अधिकारी’ यांना निवेदन द्यावे लागते. लाभार्थ्यांची निवड आधी स्थानिक समितीने करते आणि त्यानंतर शेवटची निवड ही जिल्हास्तरीय जिल्हा पशुधन अभियान समितीच्या मान्यतेनंतर केली जाते. राष्ट्रीय पशुधन मिशनची ही योजना सर्वच शेतकऱ्यांना आपली आर्थिक बाजू भक्कम करून स्वतःचा विकास करण्यासाठी पूरक ठरू शकते.

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *